Devendra Fadnavis on Ajit Pawar, Nagpur : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांना 'पर्मनंट उपमुख्यमंत्री' म्हणत विरोधकांकडून टोला लगावला जात होता. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर आज (दि.12) आज भाष्य केलं आहे.  "अजितदादा तुम्हाला लोक पर्मनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. तुम्ही जरुर एक दिवस मुख्यमंत्री व्हा", असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. ते नागपूर (Nagpur) येथील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात बोलत होते. 



गेल्या पाच वर्षात व्यक्तिगत मला आणि कुटुंबाला टार्गेट करण्यात आलं


पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, समाज एकसंघ राहिला तर आपण पुढे जाऊ शकू. त्यामुळे आम्ही एक है तो सेफ है ...हा नारा दिला. त्याला महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय. त्यातून एक मोठा विजय महायुतीला मिळाला आहे. गेली पाच वर्ष महाराष्ट्रासाठी संक्रमणाची वर्ष होती. आरोपी प्रत्यारोप करण्यात आले. महाराष्ट्राच्या संस्कृतीत आपल्यापैकी कोणीही हे अनुभवले नव्हते. गेल्या पाच वर्षात व्यक्तिगत मला आणि कुटुंबाला टार्गेट करण्यात आलं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 5 ते 7 लोक एकाच व्यक्तीवर बोलतात. मात्र, त्यांनी मला सातत्याने टार्गेट केलं. त्यामुळेच महाराष्ट्रातील लोकांमध्ये माझ्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली होती. जात जेवढी राजकारण्यांच्या मनात आहे, तेवढी जनतेच्या मनात नाही. 


अराजक निर्माण करण्यासाठी फ्रंटल संघटना तयार झाल्या


देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण नक्षलवादाविरोधात लढाई पुकारली. नक्षलवादी म्हणतात आमचा भारतीय संविधानावर विश्वास नाही. लोकशाहीवर विश्वास नाही. संविधानाने तयार केलेल्या कोणत्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही.  त्यामुळे आम्हाला समांतर राज्य तयार करायचं आहे. ज्यावेळी देशामध्ये नक्षलवादाविरोधात मोठी लढाई सुरु झाली. तेव्हा मोठा प्रमाणात आम नक्षलवादी संपायला लागले. नवीन भरती कमी व्हायला लागली. त्यावेळी हा जो नक्षलवाद आहे. हा शहरांमध्ये जागा शोधायला लागला. तेच विचार आमच्या मुलांमध्ये रोवण्याचा प्रयत्न सुरु झाला. आपण सर्वजण त्यातून गेलो आहोत. 16 ते 28 या वयात माणूस प्रत्येक गोष्ट नाकारत असतो. कारण समज नसते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत क्रांती झाली पाहिजे. अशा प्रकारची मानसिकता प्रत्येकाची असते. त्याचे क्रांतीचे मार्ग वेगळे असतात. या वर्गाला पकडून अराजक निर्माण करण्यासाठी फ्रंटल संघटना तयार झाल्या. याचं पॉप्युलर नाव झालं अर्बन नक्षलीझम ....म्हणजे काय तर देशाच्या संविधानाचं नाव घ्यायचं. मात्र, संविधानाने तयार केलेल्या संस्थेबाबत संशय निर्माण करायचा. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Devendra Fadnavis: मी आधुनिक अभिमन्यू,चक्रव्यूह भेदून दाखवलं; विधानसभेतील पहिल्याच भाषणात देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं