kalyan crime news : इंस्टाग्रामवर मित्रासोबत एका विद्यार्थीनी विषयी एक पोस्ट केली. शाळा प्रशासनाने तीन घरी पाठवत तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्या घरी येईल, अशी ताकिद दिली. चौघांपैकी एक अनिश दळवी या विद्यार्थ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणारा 16 वर्षीय अनिश अनिल दळवी हा कल्याणनजीकच्या सीक्रेट हार्ट शाळेत इयत्ता 11वीच्या वर्गात शिकत होता. मुलाच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी शाळेवर गंभीर आरोप केले आहे. आता याप्रकरणी टिटवाला पोलिसांनी शाळेच्या संचालक ऑलविन अँथोनी याच्यावर गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.
कल्याण तालुक्यातील निलंवली गावात राहणारा अनिश दळवी हा कल्याणनजीकच्या वरप परिसरातील सीक्रेट हार्ट शाळेत इयत्ता ११ वीत शिकत होता. अनिश याला शाळेने घरी पाठविले. अनिश घरी आला. त्याने राहत्या घरी गळफाश घेऊन आत्महत्या केली. पोलिस बंदोबस्तात शाळेचा संचालकास पोलिसांनी न्यायालयात केले, त्याला चार दिवसांची पोलस कोठडी सुनावण्यात आली. अकरावीत शिकणारा अनिश दळवी या विद्यार्थ्यांच्या आत्महत्ये प्रकरणी अटक झालेला शाळा संचालक आल्विन अँथोनी याला मोठया पोलिस बंदोबस्तात टिटवाळा पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. सेक्रेट हार्ट संचालक आल्विन अँथोनी याने तीन विद्यार्थ्याना बेदम मारहाण करीत शाळेतून काढण्याचा इशारा देत घरी पाठविले होते.त्यामुळे अनिश दळवी याने मानसिक तणावामुळे आत्महत्या केली.
कल्याण तालुक्यातील निबंवली गावात राहणारे व्यावसायिक अनिल दळवी यांचा 16 वर्षीय मुलगा अनिश हा कल्याण जवळ असलेल्या वरप परिसरातील सेक्रेट हार्ट शाळेत शिकत होता. एका पोस्टवरुन अनिश व त्याच्या साथीदाराने एक पोस्ट केली होती. ही पोस्ट आक्षेपार्ह होती. त्यामुळे शाळेचे संचालक अँथोनी यांनी तिघांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. त्याठिकाणी तिघाना मारहाण करण्यात आली. उद्या शाळेत येऊ नका. तुमची लिव्हींग सर्टीफिकेट तुमच्या घरी येईल. अनिश आणि त्याचे साथीदारांनी घरी निघून गेले. मात्र अनिश याने या प्रकरणाचा धसका घेतला.
दुपारी राहत्या घरी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येनंतर या संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.टिटवाळा पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरु केला. या प्रकरणी अनिशच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात अँथोनी यांच्या विरोधात तक्रार दिली. टिटवाळा पोलिसांनी अँथोनी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०७ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या दोन तासाच अँथोनी यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी त्यांना न्याायलयात हजर केले जाणार असल्याची माहिती अनिशच्या नातेवाईकांना मिळाली. त्यांनी न्यायालयाच्या आवारात एकच गर्दी केली. पोलिसांना अशी माहीती होती. न्यायालयात हजर केल्यावर संतप्त नातेवाईक हल्ला करु शकतात. त्यामुळे अँथोनी यांना मोठ्या पोलिस बंदोबस्त दोन तास उशिराने न्यायालयात हजर केले गेले. त्यांना न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. ऑलविन यांच्यावर शाळेत एक विशिष्ट धर्माचा प्रसार केल्या जात असल्याचा आरोप देखील केला गेला आहे सध्या या प्रकरणाच्या तपासता टिटवाळा पोलिसांनी सुरू केला आहे