कल्याण :  भर रस्त्यावर कार पार्किंगच्या (Car Parking) वादातून दोघा मायलेकांनी कार पार्किंग करणाऱ्या चालकासह तिघांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील (Kalyan East) हाजीमलंग रोडवरील (Hajimalang Road)  चक्कीनाका भागात असलेल्या एका खाजगी हॉस्पिटल समोर घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात (Kolsewadi Police Station) हल्लेखोर मायलेकावर विविध कलमानुसार जखमी चालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषी राजेश यादव आणि त्याची आई (रा. शास्त्रीनगर कल्याण पूर्व) असे गुन्हा दाखल झालेल्या माय-लेकाची नावे असून दोघेही फरार झाले आहेत. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार कार चालक कन्हैया चंदेशवर झा ( वय 23) हा कल्याण पूर्वेतील शास्त्रीनगर भागात असलेल्या एका चाळीत कुटूंबासह राहत आहे. तो एका खाजगी कारवर चालक म्हणून कर्यरत आहे. तर आरोपी माय-लेक हे दोघेही कल्याण पूर्वेतील शास्त्रीनगर भागातच राहतात. त्यातच 24 ऑक्टोबर रोजी सांयकाळच्या सुमारास कार चालक कन्हैया हा काही कामानिमीत्ताने कल्याण पूर्वेतील हाजीमलंग रोडवरील चक्कीनाका परिसरात कार घेऊन आला होता. त्यावेळी त्याने याच रोडवर असलेल्या एका खाजगी हॉस्पिटल समोरच कार पार्किग केली होती. मात्र, त्या ठिकाणी कार पार्किंगला आरोपी ऋषीने विरोध करत वाद घातला. त्यानंतर शिविगाळ करत असताना आरोपीच्या आईने मुलाच्या हातात लोखंडी रॉड लावून देऊन दोघांनी चालकासह त्याच्यासोबत असलेल्या दोघांना मारहाण करण्यात सुरुवात केली. तर या घटनेमुळे भर रस्त्यात एकच खळबळ उडाल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये पळापळ झाली होती.  


दरम्यान या मारहाणीच्या घटनेनंतर जखमी चालकाला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हल्लखोर माय-लेकावर भारतीय दंड विधान कलम 324, 427, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. दुसरीकडे भर रस्त्यात कारची तोडफोड करत कार चालकासह दोन जणांना बेदम मारहाणीचा पूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलीस पथकाने  हल्लेखोर माय-लेकाचा  शोध सुरू केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यु. एम. धोंगडे करीत आहेत.



दांडिया खेळताना बहिणीला धक्का देणाऱ्या तरुणाला जाब विचारला; भावावर तिघांचा प्राणघातक हल्ला


एका गरब्यात दांडिया खेळताना टवाळखोर तरुणाने बहिणीला धक्का दिल्याचा जाब विचारणाऱ्या भावावर टवाळखोरांनी प्राणघातक हल्ला केला. तिघांनी मिळून जाब विचारणाऱ्या भावाला बेदम मारहाण केली. पाय फ्रॅक्चर करत त्याच्यावर गरब्यातच  धारधार हत्याराने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  ही घटना कल्याण पूर्वेतील (Kalyan East) नेतिवली (Netiwali) येथील प्रबोधकार ठाकरे शाळेच्या मैदानात घडली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात (Kolsewadi Police Station) तिन्ही हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मंजुमील  अहमद शेख (वय 19) असे हल्ल्यात गंभीर  झालेल्या भावाचे नाव आहे. तर अमन आणि त्याचे अनोखळी दोन साथीदार असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.