कल्याण : निवासी सोसायटी, शाळा कॉलेज असो वा बँका किंवा एटीएमच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक म्हणून नेपाळी व्यक्तीला बघण्याची अनेकांना सवय झाली असेल. सुरक्षारक्षक हा नेपाळी असणं जणू अलिखित नियम बनला आहे. यावरुन त्यांच्यावरील विश्वासार्हतेची कल्पना येऊ शकते. परंतु मुंबईच्या पूर्व उपनगरातील कल्याणमध्ये एका नेपाळी चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे.


एटीएम तोडून त्यामधील पैसे चोरण्याचा नेपाळी चोरट्याचा प्रयत्न कोळशेवाडी पोलिसांनी हाणून पाडला. कोळशेवाडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हरकबहाद्दूर बुढ्ढा असं या चोरट्याचं नाव असून तो नेपाळ इथे राहणारा आहे. काही दिवसांपूर्वी तो कल्याणमध्ये आला होता.


कल्याण पूर्वेतील तिसगाव परिसरात काल (25 एप्रिल) मध्यरात्रीच्या सुमारास अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये एक इसम संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे कोळशेवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत एटीएम फोडून पैसे चोरणाऱ्या या चोरट्याला रंगेहाथ अटक केली.


हरकबहाद्दूर बुढ्ढा असं या चोरट्याचं नाव. तो मूळचा नेपाळमधला आहे. काही दिवसांपूर्वी तो कल्याणमध्ये आला होता. एटीएम तोडून पैसे काढण्याच्या तयारीत असताना कोळसेवाडी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.


इतर बातम्या


चोरट्यांनी चक्क जेसीबीने फोडले एटीएम, सांगली जिल्ह्यातील मिरजमधील घटना


Mumbai Crime : आधी एटीएममधील 77 लाखांची चोरी, नंतर एटीएम मशीनच पेटवली, कॅश लोड करणाऱ्या दोघांना अटक


इंटरनेटवर व्हिडीओ पाहुन एटीएम मशीन लुटीचा प्रयत्न आग लागल्यानं फसला!


नागपूरमध्ये एटीएम मशीन गॅस कटरने कापून तब्बल 19 लाखांची रोकड लंपास, महिनाभरातली नववी घटना


पिंपरीत धाडसी चोरीचा प्रयत्न, जिलेटीन कांड्यांचा स्फोट घडवून ATM फोडलं