Hair Colouring Tips : आजकाल लोकांना केसांना कलर करायला आवडतं. आधी लोख फक्त केस पांढरे झाल्यावर केस कलर करायचे, मात्र आता लोक आवड म्हणून केस कलर करतात. काही लोक केसांचा पांढरा रंग लपविण्यासाठी कलर करतात. तर काही लोक त्यांच्या लूकमध्ये बदलण्यासाठी केस कलर करतात. काही लोक  केसांना कलर करण्यासाठी पार्लरमध्ये जाण्याऐवजी घरीच केसांना कलर करतात. देण्यास प्राधान्य देतात. तुम्ही घरच्या घरी केसांना सहज कलर करू शकता. पण कलर लावताना लोकांच्या नकळत काही चुका होतात, ज्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, या मुद्द्यावर लक्ष ठेवून तुम्ही केसांना कलर करू शकता.


चुकीचा रंग निवडणे
बरेच लोक कलरचे बाहेरचे पॅकिंग पाहून कलर पॅक निवडतात, हे पूर्णपणे चुकीचे आहे. बॉक्‍सवर छापलेल्या फोटोवरून तुम्‍ही कलर निवडू नये, कारण त्यामध्ये फरक असू शकतो. तुमच्या केसांना नवीन कलर लावण्यापूर्वी नेहमी पॅच टेस्ट करा जेणेकरून तुम्हाला रंगाची अचूक कल्पना येईल.


केसांवर कलर जास्त काळ ठेवणे
काहींना असे वाटते की, केसांवर कलर करताना जितका वेळ जास्त कलर ठेऊ तितका चांगला रंग येईल. पण हे चुकीचं आहे. केसांवर जास्त काळ कलर ठेवल्याने केस खराब होऊ शकतात. त्यामुळे केसांवर फक्त 20 ते 30 मिनिटे कलर लावा आणि त्यानंतर केस धुवा.


इतरांच्या हेअर कलरनुसार कलर निवडणे
बऱ्याच वेळा आपण इतरांच्या केसांचा रंग पाहून आपल्या केसांसाठी शेड निवडतो. यावेळी आपण आपल्या केसांच्या रंगाकडे दुर्लक्ष करून समोरच्या व्यक्तीने वापरलेल्या कलर निवडतो. असं करणं पूर्णपणे चुकीचं आहे. इतरांच्या हेअर कलरनुसार कलर निवडू नका. तुमच्या केसांनुसार कलर निवडा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :