Jalna Crime: जालन्यातून खुनाचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असणाऱ्या एका तरुणाची चाकू आणि दगडाने ठेचून हत्या झाली आहे. १० ते ११ अज्ञातांकडून दिवसाढवळ्या खून करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 


हत्येची अंगावर काटा आणणारी दृश्ये मोबाईलमध्ये कैद


जालना जिल्ह्याच्या मंठा चौफुली भागातील ही घटना आहे. भर दिवसा झालेल्या या हत्येची अंगावर काटा आणणारी दृश्य मोबाईलमध्ये कैद झाली आहेत. शेख खुसरो शेख मंजूर असे या खून झालेल्या आरोपीचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी या तरुणाने एका तरुणीचा खून केला होता. त्या प्रकरणातूनच ही हत्या झाल्याचा संशय आहे.


खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या या आरोपीने सोमवारी रात्री जालन्यातील एका तरुणीची हत्या केली होती. प्रथमिक माहितीनुसार ही घटना किरकोळ वादातून घडल्याचे सांगण्यात आले असले तरी या प्रकरणातूनच ही हत्या झाल्याचा संशय आहे. 


चाकू आणि दगडाने केले वार


जालन्यात दिवसाढवळ्या घडलेल्या या तरुणाच्या हत्येत १० ते ११ अज्ञातांनी या तरुणावर चाकूने व दगडाने वार केले. यातच या तरुणाचा मृत्यू झाल्याचे कळते. या घटनेची दृश्य मोबाइलमध्ये कैद झाली आहेत. या तरुणाचे वय २० वर्ष असून खुनाच्या आरोपात असल्याचे सांगण्यात आले.


जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने अंगावर डिझेल ओतून वृद्धाला जिवंत जाळले


जमिनीच्या मालकीवरुन सुरु असलेला वाद विकोपाला गेल्यामुळे नाशिक जिल्ह्यात (Nashik Crime) एका वृ्द्ध व्यक्तीला जाळण्यात आल्याची घटना घडली आहे. निफाड तालुक्यात हा प्रकार घडला आहे. येथील थडी सारोळे गावातील कचेश्वर नागरे (वय 80) यांच्या अंगावर सख्ख्या भावाच्या कुटुंबीयांनीच डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले. यामध्ये कचेश्वर नागरे (Kacheshwar Nagre) 95 टक्के भाजले होते.  त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


प्राथमिक माहितीनुसार, कचेश्वर नागरे यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबीयांनीच त्यांच्यावर डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले. यानंतर नागरे यांच्या कुटुंबीयांनी जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.


हेही वाचा 


Nashik News: मोठी बातमी: जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने अंगावर डिझेल ओतून वृद्धाला जिवंत जाळले; निफाडमधील हादरवणारी घटना


आम्ही मिहीरला घेऊन पळून गेलो कारण... बहिणीनं सांगितलं कारण; कावेरी नाखवांच्या मारेकऱ्याची महत्त्वाची कबुली