Jalgaon Crime News : राज्यात अमली पदार्थांच्या तस्करी विरोधात पोलिसांनी कडक धोरण अमलात आणलं आहे. अशातच जळगावच्या धरणगावात (Dharangaon) नाकेबंदी दरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजाची तस्करी (Crime News) करणारी कार पकडली आहे. ज्यामध्ये 40 किलो गांजा आणि कारसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग केला असता भीतीने कार चालकांनी झाडाझुडपांमध्ये वाट काढत आणि कार जागीच सोडून पळून काढला. सध्या पोलीस या दोन संशयित फरार आरोपींचा शोध घेत आहे. मात्र पोलिसांच्या कारचा थरारक पाठलाग सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
40 किलो गांजा, कारसह 20 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुढे आलेल्या माहितीनुसार, जळगावच्या धरणगाव पोलीसांनी काल (9 ऑगस्ट) अकरा वाजताच्या सुमारास थरारक कारवाई करत 40 किलो गांजा जप्त केला. चोपड्याकडून जळगावकडे जात असताना नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी संशयित कारला थांबण्याचा इशारा दिला. मात्र, चालकाने पळ काढला. पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच कार चालकाने धरणगाव बस स्थानकाजवळून यू-टर्न घेत पारोळा रस्त्याकडे कार वळवली आणि झाडाझुडपांमध्ये कार टाकून दोन्ही आरोपी फरार झाले. पोलिसांनी कारची झाडाझडती घेतली असता तब्बल 40 किलो गांजा आढळला, ज्याची किंमत साधारण दहा लाख रुपये आहे. तर कार आणि गांजा असा एकूण 20 लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
पाठलागाची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
दरम्यान, पोलिसांनी कारच्या केलेल्या पाठलागाची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून गांजाची तस्करी करणारे आरोपी कोण? ते गांजा नेमका कुठे घेऊन जात होते?, याबाबतचा तपास आता पोलिसांनी सुरू केला. आरोपींच्या शोधार्थ धरणगाव पोलिसांनी पथक रवाना केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पुणेकरांनो सावधान! 'पुमा'च्या नावाखाली बनावट टी-शर्ट, ट्रॅक पँट ची विक्री
'पुमा' कंपनीचे कॉपीराईट केलेले विविध रंगाचे बनावट टी शर्ट तसेच बूट, चप्पल, ट्रॅक पॅन्टवर पुमा कंपनीचे नाव व लोगो वापरुन कॉपीराईट कायद्याचा भंग करणार्या एका दुकानावर पोलिसांनी छापा मारला. पुण्यातील आंबेगाव भागातील या दुकानातून 8 लाख 13 हजार 750 रुपयांचा बनावट माल जप्त केला आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात शिवम लालबाबु गुप्ता या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आंबेगावमधील स्टायलॉक्स फॅशन शॉपवर करण्यात आली.
आंबेगाव येथील दुकानामध्ये पुमा कंपनीचे बनावट असलेले टी-शर्ट, शुज, चप्पल, ट्रॅक पॅन्ट विकले जात आहेत, अशी माहिती पुमा कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधी यांना मिळाली. तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. कारवाईत 2 लाख 32 हजार रुपयांचे 290 टी- शर्ट, 2 लाख 49 हजार रुपयांचे 59 बूट, 2 लाख 37 हजार रुपयांचे 198 पॅन्ट असे एकूण 8 लाख 13 हजार 750 रुपयांचे साहित्य कॉपीराईट कायद्याचा भंग करुन विक्री करताना आढळून आले.
इतर महत्वाच्या बातम्या