Beed Crime: 'पांगरी ग्रुपवर वाल्मिक अण्णा विरोधात कोणतीही पोस्ट करणार नाही, माझी चूक झाली ' असे म्हणायला लावत एका तरुणाला वाल्मिक कराडच्या गॅंगने दमदाटी करत हात जोडायला लावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असताना आता या व्हिडिओचे सत्य बाहेर आले आहे .व्हायरल होणारा हा व्हिडिओ 2023 मधील असून यातील माफी मागणारा तरुण परळी तालुक्यातील मरळवाडीच्या बापू आंधळे यांच्या खून प्रकरणातील आरोपी असल्याचा समोर येतंय .  या तरुणाचे नाव राजेश नेहरकर असे आहे . नेहरकर हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व बापु आंधळे खून प्रकरणातील आरोपी बबन गिते यांचा कार्यकर्ता आहे .

Continues below advertisement


माफी मागतानाचा व्हायरल व्हिडीओ कधीचा ?


गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मिक कराडच्या चेल्यांचे अघोरी कृत्य, सोशल मिडियावर  'वाल्मिक अण्णा ' च्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल होत असताना कराड समर्थकांकडून दमदाटी करत तरुणाला हात जोडत माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे .'वाल्मीक अण्णाच्या विरोधात कुठलीही पोस्ट करणार नाही .वाल्मीक अण्णा शिवाय पर्याय नाही माझी झाली ती चूक झाली ' असे हात जोडायला लावत माफी मागताना चा व्हायरल व्हिडिओ हा 2023 मधील असल्याचं समोर आलं आहे . गावातील ग्रुपवर बबन गिते यांच्या निवडीनंतर केलेल्या पोस्टमुळे झालेल्या वादा नंतरचा हा व्हिडिओ आहे. 2023 मधील व्हीडीओ आता व्हायरल करुन गावची बदनामी करुन कोणाला काय,साध्य करायचे आहे हे माहीत नाही, असे प्रकार थांबावेत अशी अपेक्षा पांगरी येथील ग्रामस्थ श्रीनिवास मुंडे यांनी व्यक्त केली आहे.


बापू आंधळे खून प्रकरण काय ?


बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात झालेल्या गोळीबारात एक जण ठार व दोघे गंभीररित्या जखमी झाले होते .परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा थरार घडला होता .यात मरण वाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाल्याने हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय बनलं होतं . सरपंच बापू आंधळे यांच्या डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा समोर आलं .याप्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते याच्यासह मुकुंद गीते महादेव गीते राजाभाऊ नेहरकर राजेश वाघमोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता .नुकताच वायरल झालेल्या व्हिडिओ मधला तरुण हा राजेश नेहरकर असून बापू आंधळे यांच्या खून प्रकरणातील आरोपी आहे . नेहरकर हा बबन गीतेचा कार्यकर्ता असल्याचंही समोर आलं आहे .


Beed Crime: वाल्मिक अण्णाच्या विरोधात कोणतीही पोस्ट करणार नाही, तरुणाला हात जोडायला लावत वाल्मिक गॅंगची दमदाटी