Vasai-Virar Latest Crime News : 13 महिन्यापूर्वी वसईत झालेल्या महिलेचा हत्येचा उलगडा करण्यात अखेर वसई पोलिसांनी यश आले आहे. मुलीच्या डीएनएवरुन आईच्या हत्येचा इलगडा झाला आहे.  


26 जुलै 2021रोजी वसईच्या भुईगांव समुद्रकिनाऱ्यावर एका महिलेचा मृतदेह बॅगेत सापडला होता. या मृतदेहाला  मुंडकं नव्हतं. तेव्हापासून या मृतदेहाची ओळख पटत नव्हती.  ओळख पटण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी पत्रक देखील लावली  होती.  मात्र पोलिसांना काही यश आलं नाही. या हत्येचा उलगडा करणं पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं.


मयत सानिया शेख वय वर्ष 25 हिची हत्या  तिच्या रहत्या घरात तिचा पती आसिफ शेख 32 याने केल्याच पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे.   हत्या केल्यानंतर आपल्या एका नातेवाईकांच्या मदतीने ओला गाडीतून हा मृतदेह कळंब खाड़ीत टाकला होता. हत्येनंतर आसिफला वाटलं होतं याची कुणकुण कुणाला लागणार नाही.  दरम्यान त्याच काळात सानियाचे कुटुंबीय वारंवार तिच्या चौकशीसाठी आसिफला फोन करत होते. आसिफ राँग नंबर सांगून फोन कट करता.  अखेर आपल्या मुलीच्या काळजीपोटी सानियाच्या कुटुंबियाने नालासोपारा गाठलं.  मात्र नालासोपाऱ्यात  आल्यावर  माहिती समोर आली की आसिफ तीन महिन्यापूर्वीच घर विकून पसार झाला आहे.  


अखेर सानियाच्या आजीने आसिफच्या आईला फोन  लावला. त्यावेळा आसिफच्या आईने आम्ही मुंब्रा येथे  राहत असल्याचे सांगत,  तेथील  पत्ता दिला.  अखेर सानियाचं  संपूर्ण कुटुंब मुंब्र्याच्या घरी गेलं,  तेव्हा देखील त्यांनी आपल्या मुलीला मारले अशी कबुली दिली नाही. यानंतर आपली मुलगी हरवली आहे, अशीच भावना मनात ठेवून सानिया कुटुंब मुंब्रा पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी गेलं.  मात्र मुंब्रा पोलिसांनी त्यांची तक्रार काही दाखल करून घेतली नाही.  त्यांना तुलिंज पोलीस स्टेशनला पाठवलं.  आणि तुळींज पोलीसांनी  सानियाची मिसिंग ची तक्रार दाखल करुन घेतली. तक्रार दाखल केल्यानंतर वसईचे पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी आपल्या कडील या मृतदेहाच्या चौकशीसाठी मिसिंग च्या कंप्लेंट ची तपासणी केली.  आणि याच वेळी आसिफला चौकशीसाठी बोलावलं. मात्र असिफने पोलिसांना देखील गुंगारा देण्याचा प्रयत्न केला.  काही संबंध नाही असं  सांगितलं.  


पोलिसांनी वेगळी शक्कल लढवली आसिफ आणि सानिया यांची चार वर्षाची मुलगी देखील आहे.   या मुलीचं DNA तपासणी पोलिसांनी केली.  DNA रिपोर्ट आल्यानंतर आसिफच सानियाचा नवरा आहे, याची खात्री पोलिसांना झाली आणि अखेर वसई पोलिसांनी आसिफला पोलिसी खाक्या दाखवल्यावर आसिफने आपला गुन्हा कबुल केला.  


21 जुलै 2021  रोजी बकरी ईद च्या दिवशी त्याने बेडरूममध्ये हत्या केल्याची कबुली दिली. आणि मृतदेह बेड शीट मध्ये गुंडाळून ट्रॉली बॅग मधून मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सानियाच्या हत्येमध्ये आसिफ संपूर्ण कुटुंब समावेश आहे, मात्र सध्या पोलिसांनी केवळ आसिफला अटक केली असून,  त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  आता पोलिस याच्यात आणखी एका आरोपीच्या मार्गावर असून,  लवकरच त्याला अटक करणार आहे.