Daler Mehndi : पंजाबी गायक दलेर मेहंदीला मोठा दिलासा मिळालाय. मानव तस्करी प्रकरणी झालेली शिक्षा पंजाब कोर्टाकडून रद्द करण्यात आलीय. दलेर मेहंदी याला मानवी तस्करी प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेविरोधात दलेर मेहंदी यांने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्याचे अपील उच्च न्यायालयाने मान्य करत त्याला दिलासा दिलाय. 19 वर्ष जुन्या मानवी तस्करी प्रकरणात पटियालाच्या कोर्टाने दलेर मेहंदीला दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
दलेर मेहंदी याने उच्च न्यायालयात अपील करून तीन वर्षांच्या कारावासाच्या या निर्णयाला आव्हान दिले होते. त्यानंतर त्याला मानवी तस्करी प्रकरणात दिलासा मिळाला आहे. दलेर मेहंदी सध्या पतियाळा कारागृहात आहे. याच कारागृहात माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धू यांना ठेवण्यात आले आहे. परंतु, आता न्यायालयाच्या आदेशानंतर दलेर मेहंदी याची पतियाळा तुरुंगातून सुटका होणार असून या प्रकरणाची पुढील सुनावणी पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात सुरू राहणार आहे. दलेर मेहंदी याने दाखल केलेल्या याचिकेवर पंजाब सरकारला नोटीस बजावून उत्तर मागवण्यात आले होते. त्यानंतर हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी आज निश्चित केली होती. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने निकाल देताना त्याला मोठा दिलासा दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
पंजाबी गायक दलेर मेहंदी गाण्यांच्या कार्यक्रमासाठी अनेकदा विदेशात दौरा करत असे. 1998-99 साली एका दौऱ्यादरम्यान परवानगी न घेता इतर दहा लोकांना तो अमेरिकेत घेऊन गेला होता. त्या दहा लोकांकडून त्यााने अमेरिकेत जाण्यासाठी पैसेदेखील घेतले. त्यामुळे दलेर मेहंदीवर मानव तस्करीची एफआयआर दाखल करण्यात आली होती. चौकशीनंतर दलेर मेहंदीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणी तपास करून पोलिसांनी त्याच्याविरधात कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणी कोर्टाने त्याना तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
दलेर मेहंदी कोण आहे?
1995 मध्ये दलेर मेहंदीचा ‘बोलो तारारारा’ हा पहिला अल्बम प्रचंड लोकप्रिय झाला होता. 1998 मध्ये दलेर मेहंदीचा ‘तुनक तुनक तून’ हा अल्बमही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. बिहारच्या पाटण्यात 18 ऑगस्ट 1967 साली जन्मलेला दलेर मेहंदी गायक तर आहेतच शिवाय गीतकार, लेखक आणि निर्माता देखील आहे. दलेर मेहंदीने आपल्या आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.