एक्स्प्लोर

Pune news : धर्मांतर करण्यासाठी पत्नीला मारहाण; 2001 पासून मानसिक त्रास, पतीविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी पत्नीला मारहाण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील येरवडा परिसरात ही घटना घडली आहे.

Pune Crime news : ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी पत्नीला पतीकडून मारहाण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील येरवडा परिसरात ही घटना घडली आहे. रविंदरसिंह भंवरसिंह राजपुरोहित असं 43 वर्षीय पतीचं नाव आहे. या प्रकरणी पतीवर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांंनी दिलेल्या माहितीनुसार, रविंदरसिंह भंवरसिंह राजपुरोहित यांनी स्वत: खिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यानंतर मागील 21 वर्षांपासून ते पत्नी आणि मुलांनी खिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी पत्नीला त्रास देत होता. त्याने काही दिवसांपूर्वी घरातील चक्क घरातील मूर्ती आणि फोटो नदीत टाकून दिले होते. या सगळ्या प्रकाराला वैतागून अखेर पत्नीने पोलिसांत धाव घेतली.  43 वर्षाच्या पत्नीने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

हा प्रकार 2001 पासून सुरु होता
पती राजपुरोहित याने 2001 मध्ये खिश्चन धर्म स्वीकारला. तेव्हापासून पत्नीने आणि तिच्या आईवडिल मुलांनी खिश्चन धर्म स्वीकारावा, यासाठी तो शारीरीक आणि मानसिक त्रास देत होता. पत्नीला आणि घरच्यांना हाताने मारहाण करत होता. तसंच मुलाला खिश्चन धर्माच्या शाळेत टाकेल अशी धमकी देत होता. त्याने घरातील देवाच्या मूर्ती आणि फोटो नदीत टाकून फिर्यादी यांच्या धार्मिक भावना दुखावल्या. या सगळ्या त्रासाला कंटाळून कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

मुलाला खिश्चन धर्माच्या शाळेत टाकेल अशी धमकी
या दोघांची मुलं पुण्यातील नामवंत शाळेत शिक्षण घेत आहेत. मात्र घरातील तणावाच्या वातावरणाचा त्यांच्यावर देखील परिणाम होत आहे. घरात आईला मारहाण होत असल्याने मुलांच्या मानसिकतेवर देखील त्याचा मोठा परिणाम झाला आहे. या सगळ्याचा त्रास मुलांना होत आहे. मुलांच्या शिक्षण सुरळीत सुरु असताना त्यांना मुलाला खिश्चन धर्माच्या शाळेत टाकेन, अशी धमकी वारंवार रविंदरसिंह भंवरसिंह राजपुरोहित मुलांना देत होते, असं पत्नीनं दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे.

येरवडा पोलिसांकडून तत्काळ कारवाई
सध्या धर्मांतराचे प्रकार अनेक शहरात घडत असल्याचं समोर आलं आहे. मात्र अनेकांना धर्म बदलायचा नसल्याने अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. त्यांना धमकी देत किंवा जबरदस्ती करत धर्मांतर करायला आता कुटुंबीयच भाग पाडत असतात. त्यामुळे या प्रकरणाचा खोलात तपास सुरु आहे. महिलेची तक्रार येताच सदर पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: पाठीमागून भिंत फोडली, दुकानात शिरले अन्... तब्बल ३० तोळं सोनं, सव्वा किलो चांदी लुटली, पुण्यात रखवालदाराला दिलेल्या खोलीतूनच झालं कांड
पाठीमागून भिंत फोडली, दुकानात शिरले अन्... तब्बल ३० तोळं सोनं, सव्वा किलो चांदी लुटली, पुण्यात रखवालदाराला दिलेल्या खोलीतूनच झालं कांड
Nashik Crime Bhavli Waterfall: नाशिकच्या भावली धरणावर भागवत कुटुंबावर गुंडांचा हल्ला, महिलेची छेड काढली, जाब विचारताच गाडी फोडली
नाशिकच्या भावली धरणावर भागवत कुटुंबावर गुंडांचा हल्ला, महिलेची छेड काढली, जाब विचारताच गाडी फोडली
Ulhasnagar Hit And Run:  सत्तेची मस्ती? भाजप पदाधिकारी प्रकाश मुथांच्या लेकानं वयोवृद्धाला कारने चिरडलं; पळण्याच्या नादात अंगावरून पुन्हा फिरवली गाडी
सत्तेची मस्ती? भाजप पदाधिकारी प्रकाश मुथांच्या लेकानं वयोवृद्धाला कारने चिरडलं; पळण्याच्या नादात अंगावरून पुन्हा फिरवली गाडी; उल्हासनगरमध्ये 'हिट अँड रन'चा थरार
Tukaram Mundhe FDA Nagpur: नागपूरमधील तीन बड्या हॉटेल्सवर एफडीएची कारवाई, किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता अन् उंदरांचं साम्राज्य
नागपूरमधील तीन बड्या हॉटेल्सवर एफडीएची कारवाई, किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता अन् उंदरांचं साम्राज्य

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dnyaneshwar Maharaj Palkhi Warkari Accident: तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
तुझ्यासाठी आलो मी...टाळ वाजत वारकरी भजनात तल्लीन; मागून ट्रक एकसाईड घुसला, वारीतील अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO
NCP Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पत्र पाठवलं होतं, पण उत्तर मिळालं नाही, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार नाहीच; सच्चिदानंद सिंहांनी शड्डू ठोकला
सुनेत्रा पवारांच्या निवडीला आव्हान देणारे सच्चिदानंद सिंह म्हणाले, आता कोर्टाच्या आदेशाशिवाय माघार घेणार नाही
US Iran Conflict: अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
अमेरिकेचा सलग तिसऱ्या रात्रीही इराणवर कहर; ड्रोन अन् क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, '...अन्यथा आम्ही अणु ठिकाणही उडवू'
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
Sunetra Pawar NCP Crisis: सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप घेणाऱ्या नोटीसमागे वेगळाच मास्टरमाईंड? सुनील तटकरे-प्रफुल पटेलांनी....
सुनेत्रा पवारांच्या निवडीवर आक्षेप घेणाऱ्या नोटीसमागे वेगळाच मास्टरमाईंड? सुनील तटकरे-प्रफुल पटेलांनी...
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
Embed widget