Crime News: देशात अॅसिड हल्ल्याच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यात एकतर्फी प्रेमातून अॅसिड हल्ले होण्याचे प्रमाणात अधिक आहे. मात्र नालासोपारात एक वेगळेच प्रकरण समोर आले आहे. येथे एका पतीने आपल्याच पत्नीवर तिच्या प्रियकरासोबत मिळून अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत तरुणीचा चेहरा आणि हात भाजला असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यातील हे दोन्ही आरोप फरार आहेत. फरार आरोपींचा पेल्हार पोलीस शोध घेत आहेत. 


पत्नीच्या प्रियकरासोबत मिळून रचला कट


नालासोपारा पूर्व वाकणपाडा येथील रहिवासी करिश्मा अली (20) हिचा विवाह घाटकोपर येथील तौफिक इद्रासी याच्याशी झाला होता. मात्र तौफीक तिला मारहाण करत होता. म्हणून ती त्याच्यापासून दूर राहत होती. त्यानंतर ती त्याच परिसरात राहणाऱ्या कामरान अन्सारीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. मात्र कामरानने करिश्माशी लग्न करण्यास नकार दिल्याने तिने त्यालाही सोडून दिले. यानंतर ती नालासोपारा येथील कमाल खानसोबत राहू लागली.


याची माहिती पती तौफिक आणि प्रियकर कामरान यांना मिळताच त्यांचे करिश्मासोबत भांडण झाले. पण करिश्मा या दोघांसोबत राहण्यास तयार नव्हती आणि तिला कमालसोबत राहायचे होते. करिश्माच्या नकारामुळे तिचा नवरा आणि प्रियकर संतापले आणि दोघांनीही आपली नाही तर कुणाचीच नाही, या भावनेतून याचा बदला घेण्याचा कट रचला. मागील सोमवारी म्हणजेच 31 ऑक्टोबरच्या रात्री दोन वाजण्याच्या सुमारास कमाल आणि करिश्मा झोपले असताना तौफीक आणि कामरान यांनी खिडकीच्या काचा उघडून त्यांच्यावर अॅसिड फेकले. यानंतर या दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. अॅसिड हल्ल्यात कमालही जखमी झाला असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. याप्रकरणी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, पेल्हार पोलिसांनी पती तौफीक आणि प्रियकर कामरान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.


एकतर्फी प्रेमातून 42 वर्षीय महिलेवर अॅसिड हल्ला


ऑक्टोबर महिन्यातच वर्ध्यातही अॅसिड हल्ल्याची घटना घडली आहे. येथे महावीर गार्डनच्या तिकीट काउंटरवर कार्यरत असलेल्या 42 वर्षीय महिलेवर एकतर्फी प्रेमातून अॅसिड हल्ला झाल्याची घटना घडली. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी या घटनेतील आरोपी विजय चाफले याला अटक केली आहे. 


इतर बातम्या: 


एकतर्फी प्रेमातून 42 वर्षीय महिलेवर अॅसिड हल्ला, वर्ध्यातील धक्कादायक घटना