Hingoli News: नांदेडहून हिंगोलीच्या दिशेने गुटख्याची वाहतूक (Gutkha Truck) करणाऱ्या ट्रकवर आज कळमनुरी पोलिसांनी माेठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल २१ लाख ६० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.


हिंगोलीमध्ये नांदेडहून मोठ्या प्रमाणात गुटखा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून कळमनुरी पोलिसांनी आज ही कारवाई केली आहे.


तब्बल २१ लाखांचा गुटखा जप्त


हिंगोली शहरालगत असलेल्या नवीन बायपास रोडवर या ट्रकवर ही कारवाई करण्यात आली. या ट्रकमधून तब्बल 21 लाख 60 हजार रुपयांचा गुटखा आणि 7 लाख रुपये किमतीचा ट्रकअसे एकूण 28 लाख 60 हजार रुपये किमतीचा ऐवज कळमनुरी पोलिसांनी जप्त केला आहे.


व्यावसायिकाच्या घरात दरोडा टाकणारे दरोडेखोर जेरबंद


संभाजीनगरच्या एन-1 सारख्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये अलिशान कारमध्ये आलेल्या चोरांनी बंगल्याच्या खिडकीचे गज कापून व्यावसायिकाचे तब्बल 106 तोळे सोने, हिरेजडित दागिने लंपास केले होते. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच चोरांनी पसार केलेल्या दागिने जप्त केले आहेत.


दागिन्यांसह रोख रक्कम केली पसार


छत्रपती संभाजी नगरच्या सिडको एन वन भागात दरोडेखोरांनी सोने, हिरे, मोती व चांदीसह दागिने लंपास केले असून तब्बल 87 लाख 69 हजार रुपयांची रक्कमही पसार केली आहे.  व्यावसायिकाने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, या दागिन्यांमध्ये त्यांच्या पत्नीला स्त्रीधन म्हणून मिळालेले दागिनेही होते. चाेरीला गेलेल्या ऐवजात सोन्या-चांदीसह हिऱ्याचेही दागिने होते.


अंमली पदार्थ प्रकरणी अभिनेत्रीचा भाऊ अटकेत


बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) हिचा भाऊ अमन प्रीत सिंग याला (Aman Preet Singh Arrest) पोलिसांनी अटक केली आहे. अमन प्रीत सिंग याला ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती आहे. अमनने कोकेनचे सेवन केले असल्याचे वैद्यकीय चाचणीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाशी रकुलचा संबंध नसल्याचेही हैदराबाद पोलिसांनी सांगितले आहे. 


हेही वाचा:


Chhatrapati Sambhajinagar Crime: सावधान! लाडकी बहीण योजनेचा लाभ मंजूर करते म्हणून महिलेने उकळले पैसे, महिलेवर गुन्हा दाखल