Jharkhand CM Hemant Soren News : झारखंडचे मुख्यमंत्री (Jharkhand News) हेमंत सोरेन (Hemant Soren) यांची आज ईडी चौकशी (ED) होणार आहे. हेमंत सोरेन यांनी ईडीकडून चौकशीसाठी समन्स देण्यात आलं असून त्यांच आज दुपारी 1 वाजता चौकशी होणार आहे. ईडी पथकाने सोमवारी हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी छापेमारी केली, मात्र त्यावेळी सोरेन तिथे उपस्थित नव्हते.  हेमंत सोरेन मागील 40 तासांपासून गायब होते, त्यानंतर आता ते ईडीसमोर हजर होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, चौकशीनंतर हेमंत सोरेन यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असं सांगितलं जात आहे. 


झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची ईडी चौकशी


झारखंडमधील जमीन घोटाळ्याशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीचे पथक मंगळवारी हेमंत सोरेन यांच्या बंगल्यावर पोहोचले होते. ईडीने बंगल्यातून हरियाणा क्रमांकाची बीएमडब्ल्यू कार आणि रोख रकमेसह काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त केली आहेत. सोमवारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर ईडीने छापेमारी करण्यात आली. ईडीने नोटीस जारी केल्यानंतर 29 जानेवारीपासून सोरेन संपर्कात नव्हते. या छाप्यादरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन निवासस्थानी उपस्थित नव्हते. दरम्यान, ईडीच्या पथकाने  हेमंत सोरेन यांच्या बंगल्यातून मोठी रोकड जप्त केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हेमंत सोरेन यांच्या बंगल्यातून 36 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले असून, दोन आलिशान कारही जप्त करण्यात आल्या आहेत.


ईडीकडून बंगल्यातून महत्त्वाची कागदपत्रे जप्त


दक्षिण दिल्लीतील हेमंत सोरेन यांच्या बंगल्यावर ईडीने सोमवारी छापा टाकला. ईडी पथकाने सुमारे 13 तास बंगल्यात छापेमारी केली. झारखंडमधील जमीन घोटाळ्याशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीचे पथक हेमंत सोरेन यांच्या बंगल्यावर पोहोचले होते. ईडी बंगल्यातून रोख रकमेसोबतच एक हरियाणा क्रमांकाची बीएमडब्ल्यू कार आणि आणखी एक कार आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हेमंत सोरेन यांनी ईडीला सांगितले की, ते बुधवारी त्यांच्या रांची निवासस्थानी दाखल होणार आहेत.


मंत सोरेन यांना ईडीकडून 10 वेळा समन्स


29 जानेवारी रोजी ईडी सोरेन यांची चौकशी करण्यासाठी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पोहोचली होती. पण सोरेन त्या ठिकाणी सापडले नाहीत. दिल्लीत 3 ठिकाणी ईडीने टाकलेल्या धाडीत काही महत्त्वाची कागदपत्रे, बीएमडब्ल्यू कार आणि 36 लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. हेमंत सोरेन यांना याआधी ईडीकडून चौकशीसाठी 10 वेळा समन्स बजावण्यात आलं आहे, पण ते दरवेळी ईडी चौकशी टाळत होते.