Sachin pilot: विधानसभा निवडणूका जसजशा जवळ येऊ लागल्यात तसे आपापल्या पार्टीतील नेत्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडीयावर टाकून अनेकजण त्या पक्षाला पाठिंबा देताना दिसतात. असेच सध्या मविआच्या समर्थकांनी केलेल्या वादग्रस्त सचिन पायलट यांच्याविषयी केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. भाऊंच्या लूकपुढे बॉलिवूड फिकं पडतंय असं लिहित काँगेसचे नेते सचिन पायलट यांचा एक सुटाबुटातला एक व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे. यावर नेटकऱ्यांनी सुसाट प्रतिक्रीया दिल्या आहेत.


'आपल्याकडचं दाखवा ना, दुसऱ्याचं लेकरू कशाला कडेवर घ्यायचं', 'पायलटला एकदा बीजेपीनं हायजॅक केलं होतं विसरलास का', 'देखणा नेता' अशा प्रतिक्रीया देत चांगलंच व्हायरल केलंय.


महाविकास आघाडीच्या पेजवरून शेअर


महाविकास आघाडीच्या समर्थक पेजवरून शेअर हा व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. यात काँग्रेस नेते सचिन पायलट यांचा सूटाबुटातला एक व्हिडीओ या पेजवरून शेअर करण्यात आला असून त्यावर भाऊच्या लूकपुढं अख्खं बॉलिवूड फिकं पडतंय. नाम तो सुना होगा, उगं नव्ह माय काँग्रेसी होय असं लिहंलं आहे.


 






नेटकऱ्यांनी उडवली व्हिडिओची खिल्ली


या व्हिडिओची अनेक नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली असून पिंकी बॉय, दाढी आली की पप्पू PM बनेल, आपल्याकडचं दाखवा ना, दुसर्‍याचं लेकरू कशाला कडेवर घ्यायचं? मॉडेल कंपनी उघडा अशा प्रतिक्रीया उमटवत व्हिडिओची खिल्ली उडवल्याचं दिसलंय. तर काहींनी सचिन पायलट यांच्या व्हिडियोत देखणा नेता, एक्सलंट पर्सनॅलिटी असं लिहीत कौतूकही केलं आहे.




नाम तो सुना होगा म्हणत केला व्हिडीओ पोस्ट


नाम तो सुना होगा असं लिहित महाविकास आघाडीच्या समर्थक पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात काँग्रेसनेते सचिन पायलट एका कार्यक्रमासाठी उपस्थित असून चर्चा करताना, सुटाबुटात चालताना त्यांना दाखवण्यात आले आहे.


पीओके जम्मू आणि काश्मीरचा भाग असेल


काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी नुकतेच भाजपच्या अलीकडील 'पीओके जम्मू आणि काश्मीरचा भाग असेल' असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होती. जम्मू काश्मिरमध्ये होणाऱ्या दहशतवादी घटनांच्या संख्येवर बोट ठेवत जम्मू काश्मीर या खेळपट्टीवर "निवडणूक वक्तृत्व" म्हणून टीका केली आणि 10 वर्षे पूर्ण बहुमताचे सरकार असताना हे लक्ष्य साध्य करण्यासाठी पावले उचलण्यापासून कशामुळे थांबले, असा सवाल केला. जम्मू-काश्मीरमध्ये घडलेल्या दहशतवादी घटनांची संख्या पाहिल्यास, जम्मूच्या ज्या भागात कधीही घुसखोरी झाली नव्हती, (ते अनुभवत आहेत) भारत सरकारच्या चुकांमुळे शूर जवान मरत आहेत आणि शहीद होत आहेत. त्यांनी पीटीआयला सांगितले.