Nagpur Accident News नागपूर : नागपुरात पुन्हा एकदा हीट अँड रन अपघात प्रकरणाची (Heat and Run) घटना समोर आली आहे. यात एक भरधाव कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात शिरली आहे. यामुळे परिसरातील अनेक वाहनाचे नुकसान झाले असून अनेक जण यात जखमी झाल्याची माहितीही पुढे आली आहे. नागपुराच्या (Nagpur Accident) केडीके कॉलेज रोडवर एका भरधाव कार यू टर्न घेताना रस्त्याच्याकडेला असलेल्या भाजीपाल्याच्या दुकानात शिरली. प्रथमिक माहिती नुसार या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. ज्यामधील दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. तर वाहनचालकाला संतप्त जमावाने पकडून चांगलाच चोप दिला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. मात्र पुन्हा एकदा नागपूरात घडलेल्या या अपघाताच्या घटनेने शहर हादरले आहे.   


भरधाव कार थेट  दुकानात शिरली


नागपुराच्या केडीके कॉलेज रोडवर एका भरधाव कार यू टर्न घेताना रस्त्याच्याकडेला असलेल्या भाजीपाल्याच्या दुकानात शिरली. नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत केडीके कॉलेज रोडवर आज दुपारी 12:45 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे अपघात घडवणारी कार जवळच्या एका गॅरेजमध्ये सर्विसिंग साठी आली होती. मात्र, दुरुस्तीनंतर त्या गॅरेजमधून ट्रायलसाठी ही कार बाहेर काढली असता त्यात हा अपघात घडला आहे. या भीषण अपघाताची घटना परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेनंतर परिसरातील जमावाने वाहन चालकाला पकडून बेदम मारहाण केली. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत या संशयित आरोपीला अटक केली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार हा कार चालक अल्पवयीन असल्याचीही माहिती पुढे आली आहे.


अपघाताची संपूर्ण सीसीटिव्ही कॅमेरात कैद 


अपघाताची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे.   ही कार इतकी वेगवान होती की या अपघातात रस्त्याच्या लगत उभ्या असलेल्या काही दुचाकी अक्षरक्ष: उडवल्या आहेत. तर अनेकांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार यात चार जण जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सध्या पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत असून पुढील तपासाअंती अधिक माहिती कळू शकणार आहे. मात्र, या घटनेने पुन्हा शहर एकदा हादरले आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या