सांगली : सांगलीच्या कवठेमहांकाळ मध्ये ठिकाणी दुर्मिळ मांडूळ जातीचे साप विक्री करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे. या मांडुळाची तस्करी करत असल्या प्रकरणी सहा जणांना अटक करत त्यांच्याकडून तीन मांडूळ साप जप्त करण्यात आलेले आहेत. धन-दौलत व ऐश्वर्य मिळेल अशी बतावणी करून या मांडूळ सापाची विक्री या टोळीकडून करण्यात येत होती. मात्र पोलिसांना याची वेळीच माहिती मिळाली आणि छापा टाकत पोलिसांनी ही कारवाई केली.
कवठेमहांकाळ शहराजवळ दुर्मीळ असणाऱ्या मांडूळ जातीच्या सापाची विक्री करणाऱ्या एक टोळीला कवठेमहांकाळ पोलिसांनी जेरबंद केली आहे. सहा जणांना याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. यावेळी या टोळीकडून तीन दुर्मीळ असणारे मांडूळ जातीचे साप जप्त करण्यात आले आहेत. यातील एकाची किंमत अंदाजे 25 लाख इतकी असल्याचा समोर आला आहे. तीन मांडुळाची मिळून 60 लाख इतका व्यवहारात विक्री होणार होती, अशी पोलिसांनी माहिती दिली आहे.
या सापांमुळे धन-दौलत मिळते अशी बतावणी करून लोकांची फसवणूक करत विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कवठेमहांकाळ येथील मेघराज मंदीर याठिकाणी सापळा रचून साप विक्रीसाठी आलेल्या सहा जणांच्या टोळीला अटक करत त्यांच्या ताब्यातील दुर्मिळ मांडूळ जातीचे साप केले. तर सहा जणांच्या विरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये वन कायद्या अंतर्गत अवैधरित्या साप बाळगणे व तसेच लोकांची फसवणूक करण्याचा उद्देश असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या :