Gadchiroli Naxal गडचिरोली : छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यातील कांकेर येथील कोयालीबेडा परिसरात काल पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxal) मोठी चकमक झाली. यात तीन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. हे वृत्त ताजे असतांना, आज एका जहाल महिला माओवाद्याला (Naxal) अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना (Gadchiroli Police) यश आले आहे. राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा (30) असे या महिला जहाल माओवाद्याचे नाव आहे. महाराष्ट्र शासनाने तिच्यावर 6 लाखांचं बक्षीस जाहीर केले होते. प्राप्त माहितीनुसार, ही जहाल महिला माओवादी अनेक हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असून पोलिसांनी तिच्यावर अनेक गुन्हे दाखल केले आहेत. 


जहाल माओवाद्यावर होते 6 लाखांचं बक्षीस 


नक्षलवाद्यांसाठी फेब्रुवारी ते मे हा महिना 'टॅक्टिकल काऊंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन' म्हणजेच टीसीओसी असा कालावधी असतो. पोलिसांसाठी हा कालावधी शहीद आठवड्यापेक्षा कितीतरी जास्त आव्हानात्मक असतो. कारण, याच कालावधीत नक्षली पोलिसांवर सर्वाधिक हल्ले करण्याचा प्रयत्न करतात. तर पोलीसही याच कालावधीत नक्षलवादाच्या माध्यमातून देशाच्या व्यवस्थेविरोधात पुकारलेल्या सशस्त्र लढाईला चोख प्रतिउत्तर देतात. या दरम्यान नक्षल्यांकडून सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे आणि  इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे, इत्यादि देशविघातक कृत्य करण्याचे प्रयत्न केले जातात. याच टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर विविध हिंसक घटनांमध्ये सक्रिय सहभाग असलेल्या एका जहाल महिला माओवाद्यास अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे.  


विविध हिंसक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग


पकडण्यात आलेल्या 30 वर्षीय जहाल महिला माओवादी राजेश्वरी ऊर्फ कमला पाडगा गोटा हीचा अनेक  सशस्त्र कारवायांमध्ये सक्रिय सहभाग होता. यात एप्रिल 2023 मध्ये मौजा केडमारा जंगल परिसरात झालेल्या पोलीस माओवादी चकमकीच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दलाने विशेष अभियान राबवून तिला अटक केली होती. यात तिच्यावर अपराध क्रमांक 37/2023 कलम 307, 353, 143, 147, 148, 120 (ब) भादवि. सहकलम 3/25, 5/28, 8/27 भाहका, 3, 4 भास्फोका, 13, 16, 18 (अ), 20 बे कालमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलिसांनी पुढे केलेल्या अधिक तपासात असे दिसून आले की, 30 एप्रिल 2023 ला मौजा केडमारा येथे झालेल्या चकमकीमध्ये देखील तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. ज्यामध्ये गडचिरोली पोलीस दलास 3 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले होते. दरम्यान छत्तीसगड येथील बीजापूर जिल्ह्यातील तोयनार पोलीस स्टेशन येथील कचलाराम जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये देखील तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. या चकमकीच्या अनुषंगाने तोयनार पोलीस स्टेशन येथे तिच्यावर विविध गुन्ह्यात 05/2018 कलम 307, 147, 148, 149, भादंवि. सहकलम 25, 27 भाहका मध्ये 2019 मध्ये अटक देखील झाली होती. 


दलममधील कार्यकाळ



  •  2006 साली चेतना नाट मंचामध्ये सदस्य या पदावर भरती होऊन ती माओवादी चळवळीत सक्रीय झाली. 

  •  2010-11 साली चेतना नाट मंचामध्ये उप-कमांडर या पदावर पदोन्नती झाली.

  •  2016 साली फरसेगड दलममध्ये बदली होऊन सन 2019 पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होती.

  •  2019 साली पोस्टे तोयनार जि. बीजापूर (छ.ग.) च्या जंगल परिसरात पोलीस पार्टीसोबत झालेल्या चकमकीच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यात तिला अटक करण्यात आली होती.

  •  2020 मध्ये कारागृहातून सुटका झाल्यानंतर आतापर्यंत टेलर टीम दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी अंतर्गत एसीएम (एरीया कमिटी मेंबर) पदावर कार्यरत होती. 


केलेले गुन्हे पुढीलप्रमाणे


 चकमक – 04



  • 2016 मध्ये मौजा कर्रेमर्का, फरसेगड (छ.ग.) जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.

  • 2016 मध्ये मौजा मरेवाडा, भोपालपट्टनम (छ.ग.) जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.

  • 2018 मध्ये मौजा कचलाराम, बीजापूर (छ.ग.) जंगल परिसरात पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.

  • 2023 मध्ये मौजा केडमारा, (भामरागड, जि. गडचिरोली) जंगल परिसरात गडचिरोली पोलीसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा सहभाग होता.


इतर महत्वाच्या बातम्या 


Chhattisgarh Naxal : छत्तीसगड पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक; तीन नक्षल्यांना कंठस्नान