Dhruv Jurel : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या रांची कसोटी सामन्यात 5 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना 7 मार्चपासून धरमशाला येथे खेळवला जाणार आहे. चौथ्या कसोटी सामन्यात ध्रुव जेरल दोन्ही डावात चमकला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. गेल्या 22 वर्षात पदार्पणाच्या पहिल्याच कसोटी मालिकेत सामानावीर पुरस्कार जिंकणारा तो पहिलाच विकेटकीपर ठरला आहे. जुरेलच्या खेळीने भारताने चौथ्या कसोटीत पिछाडीवरून आघाडी घेतली. 


भारताला घरच्या मैदानावर हरवणे सोपे नाही!


घरच्या मैदानावर भारतीय संघाचा हा सलग 17 वा कसोटी मालिका विजय आहे. नोव्हेंबर 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशात भारतीय संघाने शेवटची कसोटी मालिका गमावली होती. त्यानंतर त्याने एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. तसं पाहिलं तर भारतीय संघाने मायदेशात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. याआधी भारताने मायदेशात सलग 2 कसोटी मालिकेत इंग्लंडचा पराभव केला होता.


मायदेशात सलग 17 कसोटी मालिका जिंकणारा भारत हा पहिला संघ आहे. यानंतर मायदेशात सलग 10 कसोटी मालिका जिंकणारा कांगारू संघ दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, मायदेशात सलग 10 कसोटी मालिका दोनदा जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला आहे. त्याने नोव्हेंबर 1994 ते नोव्हेंबर 2000 या काळात पहिली मालिका जिंकली. तर दुसरी मालिका जुलै 2004 ते नोव्हेंबर 2008 दरम्यान जिंकली होती.






इंग्लंड संघाने भारतीय भूमीवर कसोटी मालिकेतील शेवटचा विजय 2012-13 मध्ये मिळवला होता. म्हणजे गेल्या 11 वर्षांपासून इंग्लिश संघ भारतात एकही द्विपक्षीय कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. इंग्लंड संघाने भारताविरुद्ध 17 कसोटी मालिका खेळल्या, त्यापैकी फक्त 5 मालिका जिंकल्या. तर भारताने 9 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. दोन्ही संघांमध्ये 3 मालिका अनिर्णित राहिल्या. भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 36 द्विपक्षीय कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. या काळात भारताने 12 मालिका जिंकल्या, तर 19 मालिका गमावल्या. 5 मालिका अनिर्णित राहिली.


पाहिले तर इंग्लंड आणि भारत यांच्यात आतापर्यंत एकूण 135 कसोटी सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी भारतीय संघाने 34 जिंकले आहेत तर 51 मध्ये इंग्लंडला यश मिळाले आहे. दोघांमध्ये 50 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. भारतीय भूमीवर दोन्ही संघांमध्ये एकूण 68 कसोटी सामने खेळले गेले, त्यापैकी केवळ 15 कसोटी सामने इंग्लंडने जिंकले. तर भारताने 25 कसोटी सामने जिंकले आहेत. 28 सामने अनिर्णित राहिले आहेत.


भारत घरच्या मैदानावर दोनशेच्या खाली पाठलाग करताना 


सामने : 33
जिंकले : 30
अनिर्णित : 3
पराभव : 0


- 2013 नंतर भारताने पहिला यशस्वी 150+ धावांचा पाठलाग केला. शेवटचा सामना दिल्लीत मार्च 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला (भारत सहा गडी राखून जिंकला).


०-1 ने पिछाडीवर पडल्यानंतर भारताने मालिका जिंकली


2-1(5) वि इंग्लंड. 1972/73
2-1(3) वि ऑस्ट्रेलिया 2000/01
2-1(3) वि श्रीलंका 2015
2-1(4) वि ऑस 2016/17
2-1(4) वि ऑस्ट्रेलिया 2020/21
3-1(4) वि इंग्लंड 2020/21
3-1(4*) वि  इंग्लंड2023/24



  • घरच्या मैदानावर भारताचा सलग 17 वा मालिका विजय.

  • बेन स्टोक्स नेतृत्वाखाली इंग्लंडचा हा पहिला मालिका पराभव आहे.

  • पहिल्यांदाच लागोपाठ तीन कसोटी गमावल्या आहेत.