गडचिरोली : हनीट्रॅप’मध्ये अडकवून 10 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी नागपुरातील पोलीस शिपाई (Nagpur Police) आणि एका पत्रकारासह पाच जणांना गडचिरोली (Gadchiroli) गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याने एकच खळबळ माजली आहे. पोस्टे गडचिरोली येथील एक शासकिय कार्यालयामध्ये कार्यरत अभियंता यांनी याबाबत तक्रार दिली होती. 3 जानेवारी रोजी शासकीय कामानिमित्त नागपूरला (Nagpur) गेले होते. जुना मित्र सुशील गवई याने हिंगणा, नागपूर येथील हॉटेलमध्ये मुक्कामाची व्यवस्था करुन दिली. तसेच दोन महिला आरोपी रुममध्ये थांबले असता, महिला आरोपी हिने फिर्यादीवर बलात्काराचा खोटा आरोप लावून त्यांच्याकडून पैशाची मागणी केली. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत धाव घेतली, गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
फिर्यादीचा जुना मित्र सुशील गवई याने हिंगणा, नागपूर येथील हॉटेलमध्ये मुक्कामाची व्यवस्था केली. फिर्यादी तसेच दोन महिला आरोपी रुममध्ये थांबले असता, महिला आरोपी हिने फिर्यादीवर बलात्काराचा खोटा आरोप लावून पैशाची मागणी केली. तसेच घटनाक्रमाचे दरम्यान आरोपी सुशील गवई (पोलीस कर्मचारी, नागपूर शहर) याने आरोपी रवीकांत कांबळे (पत्रकार, रा. नागपूर) यास 28,000/- रुपये तसेच 2 ते 3 लाख रुपये नगदी पैसे दिल्याचे भासवलं. सर्व आरोपींनी संगणमताने बेकायेदेशिरित्या गुन्हेगारी स्वरुपाचा कट कारस्थान रचून फिर्यादीवर बलात्कार केल्याचा व त्यामुळे महिला आरोपी गरोधर राहीली आहे, असा खोटा आरोप लावून बलात्काराचा गुन्हा दाखल केला. फिर्यादीची जनमानसात बदनामी करण्याची भिती घालून हे प्रकरण मिटविण्यासाठी 10 लाख रुपये पैशांची मागणी करुन पैसे देण्यास फिर्यादीवर जबरदस्ती केली, असल्याच पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्ह्राचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक, नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांना सदर आरोपींचा शोध घेण्याबाबत निर्देशित केले. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नागपूर येथे रवाना करण्यात आले. गुन्हा दाखल होऊन अवघ्या 24 तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर शहर गुन्हे शाखा पथकच्या मदतीने गोपनिय सुत्रधारांकडुन खात्रीशीर माहिती घेऊन अतिशय शिताफीने आरोपींचा ठावठिकाणा शोधून गुन्ह्रातील आरोपी नामे 1) सुशील गवई, रा. हिंगणा, नागपूर, 2) रवीकांत कांबळे रा. नागपूर, 3) रोहित अहिर रा. सुभाषनगर, नागपूर 4) ईशानी रा. नागपूर यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईस्तव पोलीस स्टेशन गडचिरोली यांचे ताब्यात दिले. तसेच एक महिला आरोपी ही फरार असून तिचा शोध घेणे सुरु आहे. वरील सर्व आरोपी यांना गडचिरोली पोलीसांनी आज संध्याकाळी अटक केली असून गुन्ह्राचा तपास सुरू केलं आहे.