मुंबई : कोरोनाच्या दुसर्या लाटेचा मोठा तडाखा भारताला बसला आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील लोक भारताला मदत करत आवश्यक वस्तू पुरवित आहेत. दरम्यान, मुंबई नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोला अशी माहिती मिळाली की आपत्कालीन अन्न सेवांच्या नावाखाली अमेरिकेतून, विशेषत: मुंबईत ड्रग्ज सप्लाय केला जात आहे.
त्यानंतर एनसीबीच्या पथकाने अंधेरी येथील फॉरेन पोस्ट ऑफिसवर छापा टाकला आणि पार्सल जप्त केले, ज्यावर माउंटन हाऊस 5 डे आपत्कालीन खाद्य पुरवठा लिहिलेले होते. जेव्हा तो बॉक्स उघडला तेव्हा त्यात 5 पॅकेट आढळून आली, ज्यामध्ये एनसीबीला "मल्टी स्ट्रेन बड्स" मिळाले, ज्यांचे एकूण वजन 2.2 किलो होते.
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे म्हणाले की, आज या उच्चभ्रू वर्गात हे ड्रग्ज खूप लोकप्रिय होत आहे. त्याचे ग्राहक मुख्यत: अंधेरी, लोखंडवाला, दक्षिण मुंबई आणि वांद्रे भागात दिसतात.
हे ड्रग्ज खूप महाग असल्याने केवळ श्रीमंत लोकच ती घेण्यास सक्षम आहेत. हे ड्रग्ज कॅनडाहून मुंबईला पाठविण्यात आली होती, सध्या त्याचा रिसीव्हर सापडलेला नाही, त्याचा शोध सुरू आहे. वानखेडे म्हणाले की, या तपासणीदरम्यान अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात गेल्या वर्षातील 16/20 प्रकरणांचाही समावेश आहे. ज्यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, सौविक चक्रवर्ती आणि सिद्धार्थ पीठानी आरोपी आहेत.
सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज पोहोचवणाऱ्या हरीश खानला अटक
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणी तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या हाती त्याच्यापर्यंत ड्रग्ज पोहोचवणारा ड्रग पेडलर लागला आहे. हरीश खान असं त्याचं नाव असून एनसीबीने वांद्रेमधून त्याला अटक केली आहे. हरीशसोबत त्याचा भाऊ शाकिब खानला सुद्धा अटक केली आहे. शाकिबवर 19 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. शाकीबला एनसीबीने वांद्रे पोलीसांच्या ताब्यात दिलं आहे.
मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 28 मे रोजी सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) रूम पार्टनर आणि जवळचा मित्र सिद्धार्थ पीठानीला हैदराबादमधून अटक केली होती. एनसीबीने नीरज आणि केशव जे सुशांतचे नोकर होते त्यांची सुद्धा कसून चौकशी केली. या चौकशीनंतर हरीश खान याचं नाव समोर आलं. हरीश खान तोच ड्रग पेडलर आहे ज्याच्याकडून सुशांत सिंहपर्यंत ड्रग्ज पोहचवले जात होते.