Navi Mumbai: नवी मुंबईच्या तुर्भे परिसरातील वाहनचालकाचा मृतदेह झाला लटकलेल्या आवस्थेत आढळल्यानं परिसरात एकच खळबळ माजली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. 


राजू राठोड असं मृत्य व्यक्तीचं नाव आहे. राजू हे महापेतील डी मार्ट वेअर हाऊसमध्ये वाहन चालकाचे काम करतात. गुरुवारी नेहमीप्रमाणे सकाळी ते कामावर गेले ते परत आलेच नाहीत दुसऱ्या दिवशी सकाळी राजू यांच्या भावाने शोधाशोध करीत असताना डी मार्टच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला. मात्र, ते घरी असल्याने कार्यालयात गेल्यावर कळवतो असे सांगितले काही वेळाने त्यांचा फोन आला. त्यावेळी राजू यांनी आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राठोड कुटुंबीय व शेजारील लोक घटनास्थळी गेले असता त्यांना डी मार्ट आवारात प्रवेश करण्यास मज्जाव केला. मात्र, संतप्त लोकांनी प्रवेश करून पहिले असता वेअर हाऊसच्या आवारात झाडाच्या फांदीला दोरी बांधून फाशी घेतलेल्या अवस्थेत मृतदेह होता. मात्र, मांडी घालून बसलेल्या अवस्थेत असल्याने संशय निर्माण झालाय. त्याच बरोबर राजू यांच्यावर कुठलेही कर्ज तणाव काहीही नव्हते. तसेच कुठलाही गंभीर आजार व्यसन घरात वाद विवाद आदी काहीही नव्हते. त्यांचे जीवन सामान्य व्यक्तीप्रमाणे व्यथित होत असताना ते आत्महत्या का करतील? असा सवाल करीत त्यांची पत्नी व नातेवाईकांनी गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.


याशिवाय राजू यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा राजू यांच्यात नातेवाईकांनी घेतला आहे. याप्रकरणी समता समता कामगार संघाचे अध्यक्ष मंगेश लाड यांनी सांगितले की नातेवाईकांना राजू यांची हत्या केल्याचा संशय आहे. पोलिसांनी तसा गुन्हा नोंद करून योग्य तो तपास करावा, अशी आमची मागणी आहे. मयत व्यक्ती कामावर असताना मृत झाला आहे असून त्याला 3 मुली एक मुलगा आहे. नियमाप्रमाणे सदर कंपनीने नुकसान भरपाई द्यावे, अशी मागणी आम्ही केली आहे. याबाबत थेट पोलीस आयुक्तांशी भेटणार आहोत. घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून घेण्यात आली असून त्याचा तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी दिली .


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha