Crime News : डोंबिवलीहून बोईसरला जाणाऱ्या ट्रेनला कामन रोड रेल्वे स्थानकात येण्यास उशीर झाल्याने स्थानकातील प्रवाशांच्या जमावाने  स्टेशन  मास्तरला  धक्काबुकी केली होती. त्यानंतर दीड तास रेल्वे थांबवून अंदोलन केले होते. त्या जमावावर डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात  कलम 353, 323, 504, 141, 149 सह भारतीय रेल्वे कायदा कलम 147 174 (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरु केला आहे. 


ट्रेन  दीड  तासानंतर  पुन्हा  मार्गस्थ   
डोंबिवली ते बोईसर जाणारी ट्रेन 30 आगस्ट रोजी सकाळी पाच वाजून 49 मिनिटांनी सुटून  कामन रोड स्थानकात  सकाळी सहा वाजून 30 मिनिटाने पोहोचणे  अपेक्षित  होते. परंतु ट्रेन सात वाजता म्हणजे अर्धा तास उशिरा पोहोचल्याने स्थानकात असलेल्या 75  ते 100  प्रवाशांनी   रेल  रोको  आंदोलन  केले. तसेच  स्टेशन  मास्तर  यांना  धक्काबुक्की  व  अर्वाच्य  भाषेत  बोलून  त्यांच्याकडून  जबरदस्तीने  एका  कोऱ्या   पेपरवर  ट्रेन  यापुढे  लवकर  येईल  असे  लिहून घेतले. तसेच  रेल्वे थांबवून  धमकी  देत   बेकायदेशीर  जमाव  जमवून  आंदोलन  केले  होते.  त्यानंतर  ट्रेन  दीड  तासानंतर  पुन्हा  मार्गस्थ  झाली   होती.  हा  प्रकार  घडल्यानंतर  31  ऑगस्ट  रोजी  डोंबिवली  लोहमार्ग  पोलीस  ठाण्यात  गुन्हा  दाखल  करण्यात आला. 


 मालगाड्यामूळे प्रवाशी ट्रेन उशिराने प्रवाशांचा आरोप 
या  ट्रेनला  रोजच्या  होणाऱ्या  उशिरामुळे  विद्यार्थी  व  प्रवाशांना  मोठा  त्रास  होत  असून  मालगाड्या  जाण्यासाठी  स्टेशन  यंत्रणा  प्रवासी  रेल्वे  ट्रेनला  रोखून  धरले  जात  असल्याचा  आरोप  प्रवाशांकडून  केला  जात  आहे.  विशेष म्हणजे  भिवंडीकरांना  वाहतूक  कोंडीचा  नेहमीच  त्रास  होत  असतो.  या  वाहतूक  कोंडीच्या  त्रासातून  भिवंडीकरांची  सुटका  करण्याचे  काम  भिवंडी – वसई   मध्य  व  पश्चिम  रेल्वे  मार्गाला  जोडणाऱ्या  मार्गीकेतून  होत  असते.  मात्र  सध्या  भिवंडी-वसई  मार्गावर  ये जा  करणाऱ्या  डोंबिवली  बोईसर  या  लोकल  ट्रेनला  रोज  उशीर  होत  असल्याने  प्रवासी  संतप्त  झाले  होते.   तर  प्रवाशांच्या  सोयीसाठी  या  मार्गावर  अवघ्या  आठ  रेल्वे  गाड्या  वेळा  वेळाने  सोडण्यात  येत  असल्याचे  रेल्वे  प्रशासनाकडून  सांगण्यात  आले.


आणखी वाचा : 
Crime News : सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, संशयिताला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली सात जणांची टोळी गजाआड, डोंबिवली रामनगर पोलिसांची कारवाई