Crime News : कल्याण पूर्व पीसवली परिसरात एका तरुणीवर घरात घुसून तरुणाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याबाबत पीडित तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत सागर गाडे या नराधमाला अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील आत्याचाऱ्या बातम्या समोर येत आहेत.  मीरा रोड, वसई विरार, पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी महिलावर आत्याचार झाल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यात आता डोंबिवलीची भर पडली.  डोंबिवलीमध्ये एका भाजपाच्या महिलेला भाजपाच्या पदाधिकाऱ्याने शरीर सुखाची मागणी केल्याची घटना ताजी असतानाच कल्याण पूर्वेतील फसवली परिसरामध्ये एका युतीवर शेजारी राहणाऱ्या सागर गाडी या तरुणांनी घरात घुसून बळजबरीने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


सदर पीडित तरुणीही कल्याण जवळील पिसवली येथे आपल्या बहिणीच्या कुटुंबासोबत राहते. तीन वर्षांपूर्वी या पिडीत तरुणीने दहावीच्या परीक्षेचे टेन्शन घेतल्याने तिचे मानसिक संतुलन बिघडले होते.औषध उपचारानंतर तिची तब्येत आता बरी आहे. काही महिन्यांपूर्वी पीडितेची बहीण आजारी असल्याने ती गावाला गेली होती..बहिणीचे पती कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर पीडिता घरी एकटीच असायची.. ही संधी साधत  शेजारी राहणाऱ्या सागर  याने तिची छेड काढण्यास सुरुवात केली.. महिनाभरापूर्वी सागरने तिच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरी करण्याचा देखील प्रयत्न केला. आरडा ओरड केल्याने तो तेथून निघून गेला मात्र त्याने पीडितेला धमकवल्याने पीडिता घाबरली होती. त्यानंतर काही दिवसांनी सागरने पुन्हा तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने त्याच दिवशी वारंवार तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितलंस ठार मारण्याची धमकी दिल्याने पीडिता घाबरली होती. त्यामुळे तिने याची वाच्यता कुठेच केली नाही.. 


सागरने पिडीता घराबाहेर पडली असता भर रस्त्यात तिची छेड काढली .. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने घडला प्रकारआपल्या कुटुंबाला सांगितला. पीडीतेच्या बहिणीच्या पतीने  सागरला याचा जाब विचारला असता त्याने व त्याच्या कुटुंबाने त्यांचे माफी मागितली मात्र त्यानंतर काही दिवसानी पुन्हा सागरने कुटुंबाला धमकावले. अखेर या घडल्या प्रकरनी पिडीतेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी नराधम सागर विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी  पुढील तपास सुरू केला आहे.