Dombivali Crime News :  दारू पार्टीमध्ये झालेला किरकोळ वाद एकाच्या जीवावर बेतला. तिघांनी मिळून एकाची हत्या (Murder) केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याला खाडीत फेकून दिले. मात्र, पोलिसांनी (Dombivali Police) मृतदेहाचा तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे. 


दारू पार्टीदरम्यान झालेल्या किरकोळ भांडणातून येथील तीन जणांनी फुले नगरमधील एका 44 वर्षाच्या इसमाची हत्या केली. त्याचा मृतदेह डोंबिवलीतील (Dombivali) देवीचापाडा (Devichapada) येथील खाडीत फेकून दिला होता. या प्रकरणातील दोघा आरोपींना विष्णुनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सोमनाथ शिंदे असे मृत इसमाचे नाव आहे. तर त्याला ठार मारणाऱ्या योगेश डोंगरे  आणि विलन विष्णू टावरे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तिसरा मारेकरी दीपक करकडे याचा पोलीस शोध घेत आहेत. 


डोंबिवली पश्चिमेमधील देवीचापाडा खाडी किनारी एका पुरूषाचा मृतदेह खाडी किनारी तरंगत असल्याची माहिती देवीचापाडा येथील पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांना दिली होती. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला होता. मयताच्या डोक्यात मारहाणीच्या खुणा होत्या.


पोलिसांनी तातडीने तपास करून दोघा आरोपींना डोंबिवलीतील उमेशनगर आणि मोठागाव भागातून अटक केली. मृत आणि आरोपी एकमेकांचे परिचित होते. दारू पित असताना त्यांच्यात किरकोळ भांडण झाले. या भांडणातून आरोपींनी सोमनाथ शिंदे याला ठार ठार मारून त्याचा मृतदेह खाडीमध्ये फेकून दिला होता. 


भिवंडीत सेक्स वर्करची हत्या, एक क्लू सापडला, 48 तासात आरोपीला बंगालमध्ये बेड्या


 भिवंडीत (Bhiwandi) एका सेक्स वर्कर महिलेच्या हत्येच्या (Sex Worker Murder)  घटनेनंतर 48 तासांत आरोपीला अटक करून खुनाचा छडा लावण्यात यश मिळाले आहे. आरोपीचे नाव आकाशकुमार उर्फ पप्पू देवेंद्र मलिकला आहे. आकाशने भिवंडीत एका सेक्स वर्कर महिलेची डोक्यात पाटा वरवंटा घालून निर्घृण हत्या केली होती.  पोलिसांनी (Bhiwandi Police) घटनेच्या 48 तासांच्या आत आरोपी आकाशकुमार उर्फ पप्पू देवेंद्र मलिक याला पश्चिम बंगाल येथून  अटक करून खून प्रकरणाचा छडा लावला. हत्येनंतर ओडिसा राज्यात पळून जात असताना  पश्चिम बंगाल येथील खरगपूर रेल्वे स्थानकात पकडण्यात आले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :