Fitness Tips : बदलत्या वेळेनुसार आपल्या शरीरातही अनेक बदल होत जातात. तसेच, आपलं वय देखील वाढत जातं. वय वाढणं हे आपल्या हातात जरी नसलं तरी मात्र, तुम्ही काही गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही वयाच्या पन्नाशीनंतरही तरूण (Fitness Tips) आणि फीट दिसाल. वयाच्या पन्नाशीनंतरही जर तुम्हाला फीट राहायचं असेल तर यासाठी काही खास 9 टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्या तुम्ही देखील फॉलो केल्या तर तुम्ही चिरतरूण राहाल. चला तर जाणून घेऊयात. 


1. दररोज व्यायाम करणे


रोजचा व्यायाम तुम्हाला म्हातारपणातही निरोगी ठेवण्याची पूर्ण हमी देतो. त्यामुळे व्यायामासाठी फिटनेस ट्रेनरची मदत घ्या. रोज व्यायाम-योग करा. दररोज व्यायाम केल्याने वजन नियंत्रित राहते. ज्यामुळे रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते आणि हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.


2. शारीरिक क्रिया करा


तांत्रिक सुविधांमुळे आपलं आयुष्य सोपं झालं असलं तरी त्यांचा आपल्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून न राहता शारीरिक क्रिया करा. जसे की, कारऐवजी चालत जा, लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा. यामुळे तुमचे शरीर लवचिक होईल, ज्यामुळे तुमचे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहील.


3. नियमित आरोग्य तपासणी करा


हेल्थ चेकअप हे तुमच्या आरोग्याचे रिपोर्ट कार्ड आहे. त्यामुळे तुम्हाला अधिक ऊर्जा मिळण्यासाठी आणि काही गोष्टींना नियंत्रित आणण्यासाठी सतत आरोग्य तपासणी करणं गरजेचं आहे.


4. ज्या गोष्टींत मन रमेल अशी कामं करा 


रोज अशा गोष्टी करा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. असे केल्याने तुमचं आय़ुष्य वाढतं. तुम्ही पुस्तक वाचा, बागकाम करा, स्वयंपाक करा. किंवा नृत्य, गायन देखील करू शकता.  


5. सामाजिक बांधिलकी जपा 


स्वतःला थोडे सामाजिक बनवा. लोकांना भेटा, बोला.  यामुळे तुमच्या नात्यात आपुलकी आणि प्रेम निर्माण होईल. तुम्ही लोकांपासून अलिप्त राहिल्यास त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर तसेच आरोग्यावर वाईट परिणाम होतो.


6. निरोगी जीवनशैलीचा वापर करा


तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या. तणावावर नियंत्रण ठेवा, पुरेशी झोप घ्या, सकस आहार घ्या, सकारात्मक विचार करा आणि उत्साही राहा. 


7. तणाव व्यवस्थापित करा


ताणतणाव हा आपला शत्रू आहे आणि त्यापासून दूर राहायचं असेल तर तणावापासून जितके दूर राहाल, तितकेच ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी योगासने, ध्यानाची मदत घ्या. तुमच्या आवडीचे काम करा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.


8. नियमितपणे औषध घ्या


जर तुम्ही कोणत्याही आजाराशी संबंधित औषध घेत असाल तर ते नियमितपणे घ्या, तुमचे औषध कधीही चुकवू नका.


9. सकस आहार घ्या


वयानुसार तुमच्या आहाराचा विचार करा. तुम्ही जे खात आहात ते निरोगी आहे याची खात्री करा. तसेच, तुम्हाला तुमच्या आहारातून सर्व आवश्यक पोषक तत्वे मिळायला हवीत. तुमच्या आहारात ताजी फळे, भाज्या आणि कमी चरबीयुक्त पदार्थांचा समावेश करा. तसेच, मद्यपान आणि धूम्रपानापासून दूर राहा. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला चिंताग्रस्त, थकल्यासारखे वाटत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका; हे एक गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं