डोंबिवली :  शेअर बाजारातील गुंतवणुकीवर (Share Market Investment) झटपट पैसे कमावून श्रीमंत होण्याची स्वप्ने अनेकजण पाहतात. लोकांच्या याच मानसिकतेचा गैरफायदा घेत फसवणुकीच्या अनेक घटना घडत असतात.  अशाच एका घटनेतील आरोपीला अटक करण्यात यश मिळाले आहे. डोंबिवलीतील (Dombivali) अनेकांना गंडा घालणाऱ्या आरोपीला पुण्यात (Pune) सापळा रचून अटक करण्यात आली. 


डोंबिवली मध्ये शेअर मार्केटमध्ये  गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर 10 टक्के फायदा देण्याचे आमिष आरोपीने दाखवले होते. आरोपीने 150 हून अधिक लोकांना 4 कोटी 60 लाख रुपयाचा चुना लावणाऱ्या आरोपीला रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विनय वरटी असे या आरोपीचे नाव असून शेअर मार्केटिंग साठी त्याने डोंबिवलीत शेअर मार्केटिंग चे कार्यालय सुरू केले होते. जवळपास 150 हून अधिक नागरिकांचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले. मात्र गुंतवलेल्या पैशांवर व्याज मिळत नसल्याने अनेक गुंतवणूकदारांनी डोंबिवलीतील रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रारी दाखल केल्या. या तक्रारींच्या झेरॉक्स साठी तब्बल 42 हजार रुपये खर्च झाल्याची माहिती आहे. 


गुन्हा दाखल झाल्यानंतर हा आरोपी डोंबिवली मधून फरार झाला. मात्र, हा आरोपी पुण्यात लपून बसल्याचे माहिती डोंबिवलीतील रामनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी पुण्यात सापळा रचून या आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार या गुन्ह्यामध्ये त्यांच्यासह अजून पाच जणांचा समावेश असून यापैकी तीन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर इतर दोन जणांचा शोध सुरू आहे. मात्र, या गुन्ह्याचा हा मास्टरमाइंड असून गुन्हा दाखल होताच त्यांनी न्यायालयामध्ये जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर न केल्याने तो पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी पुण्यात एका ठिकाणी लपून राहत होता. पुण्यातील विद्यापीठ परिसरात पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे.


टेलिग्राम टास्कच्या नादात तरुणाला घातला 2.80 लाखांचा गंडा


नोकरीच्या शोधात असलेल्या एका गरजू तरुणाला आपला रिझ्युम एका ऑनलाइन ॲपवर( Online Fraud ) अपलोड करणे चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाइन नोकरीच्या जाळ्यात ओढत या तरुणांची तब्बल 2.80 लाखांची फसवणूक झालीये. सायबर गुन्हेगाराने ( Cyber ​​Crime ) या तरुणाला  झटपट पैसा कमावण्याचे आमिष दाखवून टेलिग्राम टास्कच्या ( Telegram Task ) माध्यमातून जाळ्यात ओढले.  हा धक्कादायक प्रकार पाचपावली पोलीस ठाण्याच्या ( Nagpur Crime ) हद्दीत घडला. सर्रास होणाऱ्या सायबर गुन्हात  ( Cyber ​​Crime ) दिवसागणिक वाढ होत आहे. ज्यामध्ये गुन्हेगारांच्या माध्यमातून नवनविन शक्कल लढवली जात असून त्यात सर्व वयोगटातील नागरिकांना फसविले जात आहे.