Trending News : उपचाराच्या नावाखाली एका तांत्रिकाने 19 वर्षांच्या मुलीवर जादूटोणा केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुलीने डोकेदुखीची तक्रार केल्यावर कुटुंबीय तिला रुग्णालयात दाखल केल्यावर हे प्रकरण उघडकीस आलं. डॉक्टरांनी या तरुणीच्या डोक्यातून 77 सुया काढण्यात यश मिळवलं आहे. ओदिसामधील ही घटना समोर आल्यावर एकच खळबळ उडाली आहे. डोकेदुखीचा त्रास होत असल्याने तरुणीचं रुग्णालयामध्ये सीटी स्कॅन करण्यात आलं, यामध्ये मुलीच्या डोक्यात सुया असल्याचं समोर आलं. आतापर्यंत डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून मुलीच्या डोक्यातून 77 सुया काढल्या आहेत.
तरुणीच्या डोक्यात अडकल्या 77 सुया
मुलीच्या डोक्यात सुया अडकल्या होत्या, तांत्रिकाने काळी जादू केल्या तिचीमुळे प्रकृती बिघडली. मुलीच्या डोक्यात सुया अडकल्या होत्या. ओडिशातील बुर्ला येथील वीर सुरेंद्र साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च (VIMSAR) येथील डॉक्टरांनी मुलीच्या डोक्यातून पहिल्या दिवशी 70 सुया काढल्या. त्याच्या एका दिवसानंतर, न्यूरोसर्जन टीमने फॉलोअप शस्त्रक्रिया केली, डोक्यामध्ये अडकलेल्या आणखी सात सुया काढल्या आहेत. उपचार करण्याच्या नावाखाली तांत्रिकाने तिच्या जादुटोणा केल्याचं सांगण्यात येत आहे.
डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन वाचवला जीव
वीर सुरेंद्र साई इन्स्टिट्यूटचे संचालक भाभाग्रही रथ यांनी सांगितलं की, आतापर्यंत दोन शस्त्रक्रियांमध्ये मुलीच्या डोक्यातून 77 सुया काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. सुयांमुळे मुलीच्या कवटीला सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र तिच्या डोक्यावर जखमा आहेत. रुग्णावर सध्या उपचार सुरू असून तरुणीला काही मानसिक समस्या आहेत का, याबाबतही तपासणी केली जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे.
तांत्रिकाने उपचारांच्या नावाखाली केला जादुटोणा
ओडिशातील बालंगीर जिल्ह्यात एका तरुणीला तांत्रिकाकडे उपचारासाठी नेले असता त्याने तिच्या डोक्यात 70 हून अधिक इंजेक्शनच्या सुया घातल्या. मुलीची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे ऑपरेशन करून त्याच्या डोक्यातून 77 सुया बाहेर काढण्यात आल्या.
गेल्या साडेतीन वर्षांपासून रेश्माच्या डोक्यात होत्या सुया
तरुणीच्या डोक्यातून शुक्रवारी 70 इंजेक्शनच्या सुया काढण्यात आल्यानंतर शनिवारी आणखी सात इंजेक्शनच्या सुया काढण्यात आल्या. या सुया गेल्या साडेतीन वर्षांपासून रेश्माच्या डोक्यात होत्या आणि त्यामुळे तिचे जगणे कठीण झाले होते. तिच्या डोक्यात इंजेक्शनच्या अनेक सुया घातल्यानंतर तिला आता पूर्वीपेक्षा खूप बरे वाटू लागले आहे.
बालंगीर जिल्ह्यातील सिंदकेला पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या इच गावातील 19 वर्षीय रेश्मा बेहरा हिच्या आईचं चार वर्षांपूर्वी निधन झालं. तेव्हापासून तिला डोकेदुखीचा त्रास होत होता. 2021 मध्ये यावर उपाय म्हणून तिने तांत्रिकाची मदत घेतली, असं सांगण्यात येत आहे.