Dhule Crime : शिरपूर येथील पळासनेरच्या जंगलामध्ये पैशाचा पाऊस पाडून देतो, असं खोटं सांगत दीड लाख रुपयांहून अधिकची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे, यादरम्यान आरोपींनी पैसे परत न देता बंदुकीतून दोन राउंड फायर केल्याचे देखील उघडकीस आले आहे, या घटनेतील चौघा आरोपींच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आणि सांगवी पोलिसांनी मध्य प्रदेश येथून मुसक्या देखील आवळल्या आहेत.
पैशांचा पाऊस पाडतो, दीड लाख रुपये द्या
अधिकची माहिती अशी की, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या दोघा जणांनी आम्ही पैशांचा पाऊस पाडून देतो, असं सागून त्या बदल्यात दीड लाख रुपये द्या, असा व्यवहार ठरला होता. दरम्यान, पैशांचा पाऊस पडला नाही, त्यामुळे मध्य प्रदेश येथील चौघांना दिलेले दीड लाख माघारी मागण्यात आले. मात्र, संबंधितांनी हे पैसे परत देण्यास नकार दिला. त्यादरम्यान त्यांच्यात झालेल्या झटापटीत दोन फायर बंदुकीतून देखील झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दोघांविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास करून मध्यप्रदेश येथून चौघा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यातील सांगवी येथील पैसे पाडून देण्याच अमिष दाखवणाऱ्या दोघांविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत या घटनेची माहिती दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या