Mumbai Crime News मुंबई: कंबाला हिल येथे महिलेला पाहून अश्लील चाळे (Mumbai Crime News) करणाऱ्या 27 वर्षीय आरोपीला गावदेवी पोलिसांनी रविवारी अटक केली. आरोपी आग्रा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पीडित महिला 30 नोव्हेंबरला टॅक्सीतून जात असताना कंबाला हिल बस थांब्याजवळ उभा असलेला एक तरुण पीडित महिलेला पाहून अश्लील चाळे करत होता. पीडित महिलेने याबाबत गावदेवी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.पोलिसांना आरोपी आग्रा येथील रहिवासी असल्याचे समजले. त्यानूसार पोलिसांनी तेथे जाऊन आरोपीला अटक केली.
नेमकं प्रकरण काय? (Mumbai Crime News)
पोलिसांनी सांगितले की, ही घटना 30 नोव्हेंबर रोजी घडली जेव्हा ती महिला शेअरिंग टॅक्सीने कंबाला हल बस स्टॉप ते ग्रँड रोड रेल्वे स्टेशनला जात होती, त्यादरम्यान महिलेने पाहिले की एक पुरुष तिच्या मागे येत आहे, त्यानंतर त्या व्यक्तीने त्याचे प्रायव्हेट पार्ट काढून महिलेसमोर अश्लील कृत्य केले.या घटनेनंतर महिलेच्या मैत्रिणीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, मुंबई पोलिसांना या व्हिडिओची माहिती मिळताच, मुंबई पोलिसांनी बीएनएस कलम 78 (1), 79 अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आणि चार वेगवेगळे गुन्हे दाखल केले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, वरील तथ्यात्मक व्हिडिओ 11 डिसेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास तक्रारदाराच्या मित्राने ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला होता. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर गावदेवी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने तातडीने कारवाई करत ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरील व्हिडिओ तपासला, तांत्रिक तपास केला, तक्रारदाराचा माग काढला, त्याची चौकशी केली त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला
आरोपी ग्रँट रोड आणि ब्रीच कँडी परिसरात विकायचा फरसाण-
गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गावदेवी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची एकूण 4 स्वतंत्र पथके तयार करून तांत्रिक तपास करण्यात आला आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हा घडलेल्या रस्त्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फुटेजमध्ये महिलेने केलेला दावा काही प्रमाणात खरा असल्याचे दिसून आले. आरोपीची माहिती काढली असता असे आढळून आले की, हा गुन्हा केल्यानंतर आरोपी त्याच्या गावी बामनाईताला, जिल्हा आग्रा, उत्तर प्रदेश येथे पळून गेला होता.आरोपीचा शोध घेण्यासाठी गावदेवी पोलिस ठाण्यातून एक टीम तयार करण्यात आली आणि तेथून पोलिसांनी आरोपीला अटक केली, तो दीनदयाल मोतीराम सिंह वय 27 आहे. चौकशीत आरोपी गेल्या 10 वर्षांपासून सायन कोळीवाड्यात राहत असून कुलाबा, ग्रँट रोड आणि ब्रीच कँडी परिसरात फरसाण विकत असल्याचे समोर आले.