Crime news: राज्यातील गुन्हेगारी वाढल्याची चर्चा असताना तुळजापूर शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील एका पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने छेडछाडीला (Crime news) कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, तुळजापूर शहरातील पोलीस कॉर्टर एस.टी. कॉलनीत या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicdie) केली. सारिका शिकारे असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव असून ती पोलीस कर्मचाऱ्याची मुलगी होती. 

गेल्या काही महिन्यांपासून ओंकार कांबळे हा तरुण तिला त्रास देत होता. माझ्यावर  प्रेम कर. माझ्याशी लग्न कर नाहीतर सोशल मिडीयावर तुझी बदनामी करेन, अशी धमकी ओंकार कांबळे याने सारिकाला दिली होती. तसेच तू माझ्याशी लग्न केलं नाही तर तुला बंदुकीने मारेन, असेही त्याने सारिकाला धमकावले होते. या सगळ्या त्रासाला कंटाळून सारिका शिकारे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी ओंकार कांबळे, नगिना शशिंकात पांडागळे या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सोशल मीडियावर बंदूक घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ  व्हायरल केल्याने आरोपी ओंकार कांबळेवर पुर्वीचाही गुन्हा आहे दाखल आहे. याप्रकरणी आता पोलीस पुढे काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

Mumbai Crime: मुंबईतील परळमध्ये वॉचमनकडून मुलींचा विनयभंग

मुंबईत तीन अल्पवयीन मुलींचा बिल्डिंगच्या वॉचमनने विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. परळ भोईवाडा येथे हा धक्कादायक प्रकार घडला.बुधवारी रात्री परळ भोईवाडा येथील राहत्या इमारतीखाली 11 वर्षाच्या तिन्ही मुली आल्या असताना आरोपी जयराम बेटकर याने त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. 

या घटनेची माहिती एका मुलीने घरी सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. एका मुलीच्या आईने भोईवाडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी बेटकरवर कलम 74 बीएनएस, सह 8, 12 पोस्को कायदा 2012 बीएनएस 2023 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गुरुवारी पहाटे आरोपी जयराम बेटकर याला अटक केली असून भोईवाडा पोलिस अधिक तपास करत आहेत.

Sangli Crime: सावकाराच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

एका विवाहित महिलेने सावकाराच्या जाचाला कंटाळुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील वडडी येथे ही घटना आहे. वडडी येथील राहत्या घरात सुलोचना मैत्री यांनी राहत्या घरात आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सुलोचना यांनी चिठ्ठी देखील लिहिली. या घटनेप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये झाली असून या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

आणखी वाचा

बॉयफ्रेंड राजाचा वापर फक्त नवऱ्याला मारण्यासाठी? सोनम रघुवंशी दुसऱ्या कोणासोबत पळून जाणार होती? पोलिसांना वेगळाच संशय