Indore Honeymoon Couple: मेघालयात पती राजा रघुवंशीच्या (Raja raghuvanshi) हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या इंदूरच्या सोनम रघुवंशीबाबत (sonam raghuvanshi) अनेक चक्रावून टाकणारे खुलासे समोर येत आहेत. मेघालयात बेपत्ता होणाऱ्या हनिमून कपलच्या या मिस्ट्रीने खळबळ उडाली आहे. राजा रघुवंशीच्या (Raja raghuvanshi) हत्येच्या सर्व पैलू आता समोर येत आहे. आतापर्यंत हे स्पष्ट झाले आहे की, राजाची हत्या झाली होती आणि ती सोनम, राज आणि त्याच्या तीन जणांना सुपारी देऊन केली होती. परंतु अजूनही अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत, जे पोलीस आरोपींची चौकशी करून ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
राज ती कदाचित एका मोहऱ्यासारखे वापरत असावी
या हत्येमागील खरा सूत्रधार कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज कुशवाह की सोनम रघुवंशी? पोलिस सूत्रांच्या हवाल्यानुसार टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सोनम ही या संपूर्ण प्रकरणाची खरी सूत्रधार आहे आणि राज ती कदाचित एका मोहऱ्यासारखे वापरत असावी. सर्व आरोपींच्या चौकशीवर लक्ष ठेवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोनमने सर्वांना फसवून त्यांचा वापर केल्याचे दिसून येते आहे. तिने राजला प्रेमाचे आश्वासन दिले आणि इतरांना पैशाचे आमिष दाखवले. त्यानंतर हे सर्व घडवून आणले.
पोलिसांना वेगळाच संशय
आतापर्यंत असे मानले जात होते की, राज हा या संपूर्ण प्रकरणाचा खरा कट रचणारा आहे. त्याला सोनमचा प्रियकर म्हणून वर्णन केले जात होते. सूत्रांच्या हवाल्याने टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात असे म्हटले आहे की, या प्रकरणात आणखी मोठा खुलासा उघड होऊ शकतो. असे दिसते की, राजचा वापर एका प्याद्यासारखा करण्यात आला होता. पोलिसांना संशय आहे की सोनम दुसऱ्या कोणासोबत पळून जाण्याचा विचार करत होती आणि राजला या मोठ्या प्लॅनची माहिती नव्हती आणि म्हणूनच तो सोनम रघुवंशीला मदत करत राहिला.
आता ही तिसरी व्यक्ती कोण होती हे अद्याप उघड झालेले नाही. मात्र, या घटनेनंतर आणि हत्येनंतर सोनमचे कुटुंबीय आणि प्लायवूड कंपनीत काम करणारे लोक वारंवार म्हणत आहेत की सोनम आणि राज यांच्यात प्रेमसंबंध नव्हते. राज सोनमला दीदी म्हणून हाक मारायचा आणि सोनमने त्याला अनेकदा राखी बांधली होती. जर सोनम आणि राजमध्ये खरोखरच असे कोणतेही नाते नव्हते, तर तिने तिच्या पतीला कोणासाठी मारले, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिलाँग पोलिस सोनम आणि इतर आरोपींना गुन्ह्याच्या ठिकाणी घेऊन जातील आणि पुरावे गोळा करतील. राजा यांच्या हत्येनंतर सोनम इंदूरमध्ये कुठे राहिली आणि ती कोणाला भेटली याचा तपास केल्यानंतर नवीन पैलू समोर येऊ शकतात. सध्या सर्व आरोपींची चौकशी सुरू आहे. बुधवारी पुरावे पाहिल्यानंतर सोनमने तिचा गुन्हा कबूल केल्याची माहिती आहे.
नेमकं प्रकरण काय?
हनीमूनसाठी मेघालयात गेल्यानंतर राजा रघुवंशी (वय 29) याची हत्या झाली होती. सुपारी देऊन मारेकऱ्यांकरवी पत्नी सोनमनेच (25 वर्षे) आपल्या पतीचा काटा काढल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं असून, या दृष्टीने मेघालय पोलिस मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने तपास सुरू आहे. ज्या दिवशी सोनमने व्रत ठेवले होते, त्याच दिवशी तिने तिच्या डोळ्यासमोर तिच्या पतीला संपविल्याचंही समोर आलं आहे. त्यांनी केलेल्या प्लॅाननुसार, राजा रघुवंशीला धबधब्याच्या जवळ मारायचे होते. या दरम्यान, सुपारी किलरखूप साऱ्या पायऱ्या चढून थकला होता, म्हणून त्याने राजा रघुवंशीला मारण्यास नकार दिला होता. तेव्हा सोनम त्याला ओरडून म्हणाली की, त्याला मारावे लागेल. मी तुला 20 लाख रुपये देईन.