Dapoli Crime News: वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील बोरमाळेसाठी तिचा खून केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी (Ratnagiri News) जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील विसापूर येथे घडली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी 37 वर्षीय सृष्टी कदम हिला अटक केली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्व माहिती घेऊन तपासाची सूत्रं वेगानं हलवली. पोलिसांनी बारा तासांच्या आत आरोपी महिलेला अटक केली आहे. दीपावती घाग असं खून झालेल्या 87 वर्षाच्या महिलेचं नाव आहे. दीपावती यांची मुलं मुंबईत राहत असून त्या आपल्या दापोलीतील घरी एकट्याच राहत होत्या.


 

86 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यात असलेल्या बोरमाळेच्या हव्यासापोटी 37 वर्षीय महिलेने वृद्ध महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील विसापूर गावात घडली आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास करत दापोली पोलिसांनी 12 तासांच्या आत सतीश वर्षीय सृष्टी कदम हिला अटक केली आहे. दीपावती घाग असं खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून त्या आपल्या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांच्या मुली आणि मुलं कामानिमित्त मुंबईमध्ये स्थायिक असतात. दीपावती खाक यांचे पती सिताराम घाग यांचे 1994 साली निधन झाले. ते अधिकारी पदावर कार्यरत होते. दीपावती यांना सात मुली आणि दोन मुलं आहेत. विसापूर मध्ये त्यांचे घर मोठे असून ते दुमजली आहे. दरम्यान त्यांच्या मदतीसाठी गावातील एक महिला येत असे. पण सकाळी आलेल्या या महिला निघून गेल्यानंतर दीपावती या घरी दिवसभर एकट्याच असायच्या. दरम्यान ज्या महिलेने खून केला ती महिला सृष्टी कदम हे दीपावती यांच्या परिचयाची होती. सृष्टी कदम विसापूर गावातीलच रहिवाशी आहे. दरम्यान बोरमाळेसाठी सृष्टी कदम हिने पाळत ठेवली होती.

चोरीचा उद्देश फसला


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सृष्टी कदम हिने पाणी पिण्याच्या निमित्ताने दीपावती यांच्या स्वयंपाक घरात प्रवेश केला होता. यावेळी तिने मागील दाराची कडी काढून ठेवली होती. त्यानंतर मध्यरात्री सृष्टी पुन्हा एकदा माळ चोरीच्या उद्देशाने घरात शिरली. यावेळी बोरमाळ चोरत असताना दीपावती घाग यांना जाग आली. आपली चोरी पकडली जाणार या भीतीने सृष्टी हिने दीपावती यांच्या छातीवर जोरदार प्रहार केला. त्यामुळे जागेवरच कोसळलेल्या दीपावली यांच्या अंगावरील दागिने चोरून पोबारा केला.

चौकशीत उडवाउडवीची उत्तरे 


पोलीस चौकशीमध्ये सृष्टी कदम ही उडवाउडवीच उत्तरे देत होती. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला. त्यानंतर तिला दापोली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले गेले. यावेळी सृष्टी कदम हिने आपणच खून केल्याची कबुली दिली. तसेच तिने चोरलेले दागिने देखील पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर सृष्टी कदम विरोधात कलम 302, 452, 397 अंतर्गत पुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी पोलिसांनी श्वानाचा देखील वापर केला होता. यावेळी शेतातील वाटेपर्यंत श्वान जाऊन थांबत होता. दरम्यान पुढे पाण्याचा भाग असल्याने  पुढील माग काढणे श्वानाला देखील कठीण जात होते. हा रस्ता सृष्टी कदम हिच्या घराकडे जात होता. परिणामी सृष्टी कदमच्या बाबतचा संशय अधिक बळावत होता. याच संशयातून तपासाची दिशा बदलली गेल्याचे देखील बोललेजात आहे. त्यानंतर बारा तासाच्या आत पोलिसांनी या संपूर्ण खून प्रकरणाचा उलगडा केला.