Mumbai Crime News: मुंबईत (Mumbai News) एक धक्कादायक घटना घडली. एका प्रेमी युगुलानं टेकडीवरुन उडी मारुन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना मुंबईत घडली. मुंबईच्या कांदिवली (Kandivali News) भागात ही घटना घडली असून दोघांचाही यात मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ माजली असून पोलिसांकडून (Mumbai Team) तपास सुरू आहे.
एका प्रेमी युगुलानं टेकडीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मुंबईच्या कांदिवली समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. हाऊस किपिंगचं काम करणारा 21 वर्षीय प्रियकर आणि 15 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी हे कांदिवली पूर्वेत जानुपाडा परिसरात शेजारीच राहत होते. या दोघांमध्ये प्रेम संबंध होते. मात्र दोघांच्याही प्रेमाला कुटुंबियांचा विरोध होता. दोघांनीही घरच्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण घरातल्यांनी त्यांना पाठिंबा दिला नाही. अखेर कंटाळून दोघांनीही उंच टेकडीवरून उडी मारून आत्महत्या केली. दोघांचाही यात मृत्यू झाला आहे.
मयत तरुण-तरुणी दोघेही एकाच समाजातील असून एकमेकांचे नातेवाईक आहेत. मात्र तरीही दोघांच्याही घरच्यांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. याच कारणातून दोघांनी उंच टेकडीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच समता नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवलं आहे. समता नगर पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :