Crime in Mumbai : सोनसाखळी चोरी प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन मंगळसूत्र आणि सोन्याची चेन जप्त केली आहे. हा आरोपी जिम ट्रेनर असल्याची माहिती समोर आली. आर्थिक अडचणींमुळे त्याने चोरी करण्यास सुरुवात केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर शिवाजी शेलार या 32 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहिसह पश्चिम येथील मासळी बाजाराजवळून एका महिलेची चेन आणि मंगळसूत्र घेऊन फरार झाला. आरोपीवर याआधीदेखील वसई रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
आरोपी समीर शिवाजी शेलार याआधी मालाड येथे वास्तव्य करत होता. त्या ठिकाणी तो जिम ट्रेनर म्हणून काम करत होता. आर्थिक अडचणीमुळे तो पत्नीसह विरार येथे राहण्यास गेला. त्या ठिकाणी त्याला कोणतीही नोकरी मिळाली नाही. आर्थिक अडचणींमुळे त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढत होता. कर्जाचे हप्ते देण्यासाठी त्याला पैशांची गरज होती. त्यातून त्याने चोरी करण्याचा मार्ग स्वीकारला.
चोरी करण्यासाठी आरोपी समीर वेगवेगळ्या भागात पायी जात असे. एखादी महिला एकटी फिरताना दिसल्यास तिचा पाठलाग करून मंगळसूत्र, दागिने चोरत असे आणि जवळच्या गल्लीतून पसार व्हायचा. पोलिसांनी आरोपीकडून दोन चेन आणि दोन मंगळसूत्र जप्त केले आहेत. याची किंमत जवळपास एक लाख 25 हजार रुपये आहे. आरोपीने याआधी असे काही गुन्हे केले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. कोरोना काळात चोरींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- टीईटी परीक्षेत डमी परीक्षार्थी?; म्हाडा पेपरफुटी प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे
- बोगस डिग्रीप्रकरणी वसई-विरार पालिकेच्या माजी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला बेड्या
- Nagpur Crime : सामूहिक बलात्कार केल्याची तरुणीची खोटी तक्रार, कारण ऐकून पोलिसही चक्रावले
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha