Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दिकी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी गुरुनेल सिंग यांच्या चौकशीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हरियाणाच्या कत्तल जेलमध्येच गुरुनेल हा आरोपी जिशान-अख्तरच्या संपर्कात होता . त्यावेळी जीशान अख्तरने त्याला परदेशात पाठवतो असे सांगत हत्येच्या कटात सामील करून घेतल्याचा धक्कादायक खुलासा सूत्रांनी केला आहे . हा हल्ला होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच शुभम हा भूमिगत झाला . तर जीशान-अख्तरही राज्याबाहेर पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिलीय . मिळालेल्या माहितीनुसार हे दोघेही देश सोडून पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्या अनुषंगाने लुक आउट नोटीसही जारी करण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांनी व्यक्त केलीये .
परदेशात पाठवण्याचा आश्वासन
अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दकी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी गुरुनेल सिंग यास मुंबई पोलिसांनी अटक केली होती . त्याच्या चौकशीतून एक धक्कादायक माहिती हाती लागली आहे . गुन्हेगारीचा इतिहास असणाऱ्या गुरुनेल सिंग हा हरियाणाच्या जेलमध्ये असतानाच आरोपी जीशान-अख्तरच्या संपर्कात आला होता . त्याच्या संपर्कात आल्यानंतर त्याने भारतात न राहण्याची इच्छाही बोलून दाखवली होती . त्यावेळी जीशान अख्तरने त्याला परदेशात पाठवण्याचा आश्वासनही दिले होते . याच दरम्यान जीशान अख्तरने गुरुनेलला हत्येच्या कटात सहभागी करून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली . तसेच बाबा सिद्दकी यांच्या हत्येचा कट यशस्वी झाल्यानंतर आरोपी जीशान अख्तरने गुरुनेल्ला प्रदेशात पाठवण्यात येईल असेही सांगितले होते .
ऐनवेळी दिला गुलिगत धोका
परदेशात पाठवण्याचं आश्वासन डेट हत्त्याच्या गटात सामील करून घेतले खरे . मात्र घडलं नेमकं उलट . बाबा सिद्ध की यांच्या हत्येनंतर गुरुनेल हा पोलिसांच्या हाती लागला मात्र शुभम आणि जी शान अख्तर हे पळून जाण्यात यशस्वी ठरले . हा हल्ला होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच शुभम हा भूमिगत झाला . तर जी शान अख्तरही राज्याबाहेर पडून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही देश सोडून पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्या अनुषंगाने लूक आउट नोटीसही जारी करण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांनी व्यक्त केली आहे .
लॉरेन्स बिश्नोई टोळीने हत्येची जबाबदारी स्वीकारली-
लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिसऱ्या आरोपीची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे. झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख कथीच पोस्टमध्ये केला आहे.