Horoscope Today 17 October 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य (Horocope Today) जाणून घ्या....


तूळ (Libra Today Horoscope) 


नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरीत कामाचा ताण असेल, परंतु जास्त लोड घेऊ नका.


व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, व्यापारी वर्गाचा दिवस चांगला असेल. सणांचे दिवस येत असल्याने नफा होईल.


विद्यार्थी (Student) - तुमच्या परीक्षा सुरू असतील तर जोमाने अभ्यास करा, तरच अपेक्षित यश मिळेल.


आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, ताप आणि घसादुखी तुम्हाला हैराण करू शकते.


वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  


नोकरी (Job) - नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचा आज कामाचा ताण खूप वाढू शकतो. बाकी लोकांना ऑफिसमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात.


व्यवसाय (Business) - व्यापारी वर्ग वस्तूंवर चांगली सूट देऊन ग्राहकांना आकर्षित करू शकतो. ग्राहकांची संख्या लक्षणीय वाढेल, ज्यामुळे नफाही वाढेल. 


विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं तर, आज तुमच्यावर अभ्यासाचं ओझं असेल. काही कामासाठी पालकांकडून पैसे घेण्याची गरज पडेल.


आरोग्य (Health) - आजार किरकोळ आजार जाणवेल, थकवा जाणवेल.


धनु (Sagittarius Today Horoscope)


नोकरी (Job) - नोकरदार लोकांना आज लाभ होईल. तुमच्या वरिष्ठांशी तुमचे संबंध चांगले राहतील, ते तुमच्यावर खूश होऊन काही चांगला निर्णय घेऊ शकतात.


व्यवसाय (Business) - रिअल इस्टेटमधील व्यावसायिकांचा हा काळ चांगला असेल. तुम्ही जी कोणती डील कराल त्यात चांगला नफा मिळू शकेल.


विद्यार्थी (Student) - तुम्ही आज अभ्यासात जास्त लक्ष द्यावं, अन्यथा परीक्षेत कमी गुण मिळतील आणि आईवडिलांचा ओरडा मिळेल.


आरोग्य (Health) - आज तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या. पोटदुखी किंवा डोकेदुखी तुम्हाला खूप त्रास देऊ शकते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Gajkesari Rajyog 2024 : 20 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींना सोन्याचे दिवस; गजकेसरी राजयोग ठरणार लकी, बँक बॅलन्समध्ये होणार वाढ