Ulhasnagar Crime: उल्हासनगरतील (Ulhasnagar) दाम्पत्यानं आत्महत्या (Suicide) केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आलीय. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजलीय. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात (Ulhasnagar Police Station) अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून बेरोजगारीच्या संकटातून या दामत्यानं आपली जीवनयात्रा संपवल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, या घटनेमुळं या दाम्पत्याची दोन मुलं पोरकी झाली आहेत.
सचिन सुतार आणि शर्वरी सुतार असं आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावं आहेत. मृत दाम्पत्य त्यांच्या दोन मुलांसह उल्हासनगरच्या कॅम्प 1 भागातील राजीव गांधीनगर परिसरात वास्तव्यास होते. सचिन सुतार हे सुतारकाम करायचे. सचिन सुतार हे गेल्या आठवड्यात त्यांची पत्नी आणि मुलांसह कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाऊन आले. त्यानंतर शुक्रवारी शर्वरी यांच्या माहेरी चिपळूणला जाऊन आले. तर, शनिवारी डोंबिवलीला जाऊन सचिन यांच्या वडिलांची भेट घेतली आणि त्यांच्या राहत्या घरी परतले. मात्र, आज सकाळी या जोडप्यानं घरातच गळफास घेतल्याचं त्यांच्या मुलांनी पाहिलं आणि शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. या घटनेप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचं कारण पोलीस शोधत आहे.
बेरोजगारीच्या संकटातून आत्महत्या केल्याची शक्यता
महत्वाचं म्हणजे, त्यांच्यावर कोणतंही कर्ज नव्हतं. मात्र, काही दिवसापासून हातात काम नसल्यानं आर्थिक चणचण भासत होती, म्हणून बेरोजगारीमुळं हा टोकाचा पाऊल उचलले असावे अशी परिसरात चर्चा आहे. त्यामुळं आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊनच हे दाम्पत्य देवदर्शन आणि परिवाराला भेटण्यासाठी गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर त्यांची दोन लहान मुलं मात्र पोरकी झाली आहेत.
औरंगाबाद: प्रेयसीच्या घरात गळफास लावून प्रियकराची आत्महत्या
औरंगाबाद येथे काही दिवसांपूर्वी एका तरूणानं प्रेयसीच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. औरंगाबाद शहरातील न्यायनगरात 13 नोव्हेंबरला सात वाजता ही घटना घडली. अमोलराजे चव्हाण असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नावं आहे. संबंदित मृत व्यक्ती हॉटेलमध्ये कूक होता. सुरुवातीला हा सगळा प्रकार खुनासारखा वाटला. त्या अनुषंगानं पोलिसांनी तपास करायला देखील सुरुवात केला. मात्र, मृताच्या शवविच्छेदनानंतर आत्महत्या केल्याची स्पष्ट झालं.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- नंदुरबार जिल्ह्यात ११ महिन्यात १० हजार किलो गांजा जप्त; दुर्गम भागात पोलिसांची कारवाई
- Ulhasnagar : राष्ट्रवादीची ताकद वाढल्यानं शिवसेनेची हातमिळवणी! कलानी परिवाराच्या हाती उल्हासनगरचा रिमोट कंट्रोल
- Honey Trap : कोल्हापूरचा उद्योजक 'हनी ट्रॅप'चा बळी; मैत्रिण निघाली खोटी, गमावले तब्बल सव्वातीन कोटी रुपये