Naxal Attack गडचिरोली : छत्तीसगढ (Chhattisgarh) राज्यातील नक्षल्यांचा (Naxal) गड मानल्या जाणाऱ्या अबुझमाड मध्ये पोलीस आणि नक्षल्यांमध्ये मोठी चकमक झालीय. या चकमकीत सुरक्षा दलानी आतापर्यंत 10 माओवाद्यांचा खात्मा (Naxal Attack) केलाय. या चकमकीत घटनास्थळी 3 महिलांसह एकूण 10 माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहे. तर या चकमकीत ठार झालेल्या दोन माओवाद्यांची ओळख पटविण्यातही पोलिसांना यश आले आहे. डीवीसीएम (DVCM) जोगन्ना आणि डीवीसीएम (DVCM) विनय उर्फ ​​अशोक अशी यांची नावे असून ते अनेक नक्षल कारवाईमध्ये सहभागी असल्याचीही माहिती आहे. बारच वेळ चाललेल्या या चकमकीनंतर  परिसरात शोध घेत असताना घटनास्थळावरुन अत्याधुनिक शस्त्र, एके-47 सह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. 

दोन माओवाद्यांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश 

बंदी घातलेल्या आणि बेकायदेशीर सीपीआय (CPI) या माओवादी संघटनेचे काही माओवादी कॅडर सीमाभागातील अबुझमाड भागातील काकूर-टेकमेटा-पारोडी या सीमावर्ती भागातील नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्याच्या परिसरात माओवादी उपस्थित असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती मिळताच, 29 एप्रिलला नारायणपूर डीआरजी आणि एसटीएफचे संयुक्त पथक शोध मोहिमेसाठी पाठवण्यात आले. या शोध मोहिमेदरम्यान, 30 एप्रिलच्या सकाळी 6 वाजल्याच्या सुमारास सोनपूर पोलीस स्टेशन हद्दीतील टेकमेटा-काकूरच्या जंगलात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये अचानक चकमक सुरू झाली. 

त्यानंतर माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये अनेक चकमक झाली आणि सकाळी 10 पर्यंत सैन्य अधूनमधून गोळीबार करत होते. तर अखेर संध्याकाळपर्यंत सुरू असलेल्या या चकमकीत पोलिसांनी चोख उत्तर दिल्याने माओवाद्यांनी माघार घेत पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी उशीरा या परिसराची पाहणी केली असता  3 महिलांसह एकूण 10 माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहे. 

बस्तर रेंज अंतर्गत एकूण 91 माओवाद्यांचा खात्मा 

बस्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिलेल्या माहिती नुसार, 2024 सालापर्यंत बंदी घातलेल्या आणि बेकायदेशीर सीपीआय माओवादी संघटनेच्या विरोधात केलेल्या कारवाईत बस्तर रेंज अंतर्गत एकूण 91 माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. सोबतच यात अत्याधुनिक शस्त्र- LMG-2, AK 47- 4, SLR-1, Insas- 3, 303 रायफल-4, 9MM पिस्तूल- 4 आणि मोठ्या प्रमाणात इतर शस्त्रे, दारूगोळा, स्फोटक साहित्य आणि इतर नक्षल साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती दिलीय.

इतर महत्वाच्या बातम्या