Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर शहरात 40 वर्षीय व्यक्तीला भर रस्त्यात अडवून केवळ 22 सेकंदात चाकू हल्ला करत संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील उस्मानपुरा परिसरात मंगळवारी पहाटे पाच आज त्याची ही घटना असून या चाकू हल्ल्यात चाळीस वर्षीय व्यक्ती ठार झाला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. या घटनेतील आरोपीला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील उस्मानपुरा हा अत्यंत वर्दळीचा व प्रमुख समजला जाणारा भाग आहे. या भागात झालेल्या निर्घृण हत्येनंतर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
नक्की झाले काय ?
छत्रपती संभाजी नगर शहरातील उस्मानपुरा भागात सोमवारी पहाटे पाच वाजता मृत अशोक शिनगारे फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडले होते . त्यावेळी तरुणांचा एक घोळका तिथे थांबल्याचे त्यांना दिसले .तिथे काय चाललंय हे पाहायला गेल्याने त्यातील एकाने चाकूने मानेवर पाठीवर व तोंडावर वार केले . विशेष म्हणजे हा व्यक्ती खाली कोसळल्यानंतरही आरोपी त्याच्यावर वार करत होता . या हल्ला मागचं कारण अद्याप समजू शकलं नसलं तरी दारू पिण्याच्या वादातून हा खून झाल्याचा संशय आहे .
आरोपीला तातडीने केली अटक
चाकूने हल्ला करत घाबरून पळून गेलेल्या आरोपीला उस्मानपुरा पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा च्या आधाराने पकडत तातडीने अटक केल्याचे वृत्त आहे . निखिल शिंगाडे असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे . अवघ्या 22 सेकंदात चाकूने भोसकत खून केल्याने थरकाप उडाला आहे . हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून माथे फिरू तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे .