Chhatrapati Sambhaji Nagar News: गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) दुचाकी चोरीच्या घटना मोठ्याप्रमाणात वाढल्या आहे. त्यामुळे आपली दुचाकी चोरीला जाऊ नयेत म्हणून नागरिक वेगवेगळ्या उपाययोजना करतात. यासाठी दुचाकीला वेगवेगळ्या पद्धतीने लॉक देखील लावण्यात येतात. पण दुचाकी चोरीसाठी आलेल्या चोरांनी गाडी चोरता येत नसल्याने, चक्क दुचाकीचे दोन्ही चाकं चोरून नेले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास रोडवरील अल्पाईन हॉस्पिटलसमोर ही घटना घडली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत दुचाकी चोरीच्या घटना घडत असताना, आता त्याचे पार्ट देखील चोरीला जात आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांची चिंता वाढली आहे. 


काय आहे नेमका प्रकार?


शहरातील बीड बायपास रोडवर अल्पाईन हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात जिल्हाभरातील रुग्ण येत असतात. त्यामुळे आलेल्या रुग्णाचे नातवाईक परिसरातच आपले वाहने उभे करतात. दरम्यान अशाच एका रुग्णाच्या नातवाईकाने आपली हिरो होंडा कंपनीची दुचाकी (क्रमांक MH 20 CM 8825) रुग्णालयाच्या गेटसमोर उभी केली होती. मात्र काही अज्ञात चोरांनी ही दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकीचा लॉक तुटत नसल्याने चोरांनी शक्कल लढवली आणि दुचाकीचे दोन्ही टायर खोलून नेले. त्यामुळे दुचाकी नाही तर किमान तिचे पार्ट तरी घेऊन जाण्याची चोरट्यांच्या पद्धतीने दुचाकीस्वारांची चिंता वाढली आहे. त्यामुळे आता लॉक केल्यावर देखील अशा चोऱ्या होत असती तर दुचाकीस्वारांनी गाडी पार्क करताना काळजी घेण्याची गरज आहे. 


जीपीएस लावून काय फायदा...


छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्याप्रमाणावर वाढल्या आहेत. त्यामुळे आपली गाडी चोरीला जाऊ नयेत म्हणून, दुचाकीस्वार वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे.  तर दुचाकी चोरीला गेल्यावर तीला तत्काळ शोधण्यासाठी दुचाकीस्वार यांनी जीपीएस बसवावे असे आवाहन पोलिसांकडून केले जाते. त्यामुळे चोरीला गेलेली गाडी शोधण्यासाठी पोलिसांना देखील मदत होते. मात्र आता दुचाकी चोर गाडी न चोरता तिचे पार्ट चोरून नेत असल्याने जीपीएसचा काय फायदा? असा प्रश्न दुचाकीस्वारांना पडला आहे. 


दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या...


शहरात आणि जिल्ह्यात दुचाकीस्वारांची संख्या मोठी आहे. अशात दुचाकी चोरीच्या घटना वाढत आहे. रोज जिल्ह्यात कुठेनाकुठे दुचाकी चोरीची नोंद होत आहे. सर्वसामान्य माणूस कष्टाच्या पैश्याने स्वप्नातील गाडी घेतो, अनेकदा नोकरी करणारे व्यकी आपल्या कामासाठी दुचाकी विकत घेतो. पण त्याची गाडी चोरीला गेल्यावर याचा मोठा आर्थिक फटका त्यांना बसत आहे. त्यात नवीनं दुचाकीचे दर गगनाला भिडले असल्याने यासाठी पैश्यांची जुडवाजुडवी करावी लागत असते. त्यामुळे वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना सर्वसामन्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. तर या चोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या उपायुक्त ईडी कार्यालयात दाखल; कथित निविदा घोटाळ्याप्रकरणी होणार चौकशी