Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation) वतीने शहरात राबवण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या निविदेत तथाकथित घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या (ED) पथकाने दोन दिवसांपूर्वी शहरात 9 ठिकाणी छापेमारी केली होती. तब्बल 24 तास ही छापेमारी चालली होती. दरम्यान आता या घोटाळ्यात महानगरपालिकेचे अधिकारी देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. कारण ईडी कार्यालयाने महानगरपालिकेच्या उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला समन्स दिलं होतं. त्यानंतर आज उपायुक्त अपर्णा थेटे या मुंबईत ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत. शिवाय तत्कालीन मनपा आयुक्तांसह इतर अधिकारी आणि कंत्राटदारांचे कॉल रेकॉर्डिंग ईडीचे अधिकारी तपासणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तत्कालीन मनपा आयुक्तांसह अधिकारी संशयाच्या फेऱ्यात सापडले आहेत.


सविस्तर बातमी थोड्याच वेळात...