Chandrapur : बल्लारपूर शहरातल्या बसस्थानकवरचा धक्कादायक प्रकार समोल आलाय. बल्लारपूर रेल्वे स्थानकात डेप्युटी स्टेशन मास्टर असलेल्या मिर्झा बेग (वय 53) याने अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी डेप्युटी स्टेशन मास्टर मिर्झा बेग याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. बसमध्ये प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थीनींसोबत अश्लील कृत्य केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आलाय.  


संतापलेल्या कुटुंबियांनी रेल्वे अधिकरी बेग याला बेदम मारहाण


अधिकची माहिती अशी की, विद्यार्थिनी बल्लारपूर ते चंद्रपूर असा महाविद्यालयासाठी करतात प्रवास, या विद्यार्थिनी सकाळी बल्लारपूर बस स्थानकावर असताना आरोपी मिर्झा बेग याने छेड काढली. घाबरलेल्या मुलींनी कुटुंबियांना घडला प्रकार सांगितल्यानंतर संतापलेल्या कुटुंबियांनी रेल्वे अधिकरी बेग याला बेदम मारहाण केली. बल्लारपूर (Chandrapur) पोलीसांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहून गुन्हा दाखल करून तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. महिला सुरक्षेबाबत देशभर चिंता व्यक्त केली जात असतानाच सार्वजनिक ठिकाणी देखील महिला सुरक्षित नसल्याचं चिंताजनक चित्र आलं समोर आलं आहे. 


चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी चिमुकल्या मुलींच्या विनयभंगाच्या 2 घटना उघडकीस


चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात एकाच दिवशी चिमुकल्या मुलींच्या विनयभंगाच्या 2 घटना उघडकीस आल्या आहेत.  पोलिसांनी दोन्ही घटनांमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केलीये. पहिली घटना नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील असून घराजवळ खेळणाऱ्या एका 8 वर्षीय चिमुकल्या मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून महादेव गोरडवार (वय 52) या आरोपीने विनयभंग केलाय. तर दुसऱ्या एका घटनेत चिमूर तालुक्यातील दाबला हेटी गावात मद्यपी तरुणाने 5 वर्षीय मुलीचा  विनयभंग केला. पीडित मुलगी शाळेत जात असतांना 25 वर्षीय आरोपीने दारूच्या नशेत विनयभंग केलाय. 


अकोल्यात जन्मदात्या पित्याचे मुलीवर लैंगिक अत्याचार


महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत अनेक लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. सातत्याने लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जातोय. अशातच अकोल्यात बापानेच आपल्या 10 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. अखेर या प्रकरणात मुलीने बाल न्यायालयासमोर वडिलांची तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Politics : पुण्यात, कोल्हापुरात शरद पवारांनी डाव टाकला, पण सांगलीत भाजप मोठ्या खेळीच्या तयारीत! थेट राष्ट्रीय सरचिटणीसांची फोनाफोनी अन् भेटीगाठी