Netflix 5 Crime Thriller Web Series: ओटीटी (OTT Release) हा सिनेमाचा तिसरा पडदा आहे, असं म्हटलं जातं. सध्या मनोरंजन क्षेत्रात (Entertainment Sector) ओटीटीचा दबदबा आहे. अनेक चित्रपट थिएटरऐवजी ओटीटीवर रिलीज होतात. तर, बॉलिवूडचे दिग्गज चित्रपट थिएटर गाजवल्यानंतर पुन्हा ओटीटी रिलीज करतात. सध्या ओटीटी आपल्या डार्क कंटेंटनं सध्या प्रेक्षकांना भलतंच आकर्षित करतंय. वर्षानुवर्षे अनेक चित्रपट (Movies) आणि वेब-सिरीज (Web Series) OTT वर स्ट्रीम होत आहेत. यामध्ये नव्या आणि जुन्या सर्व चित्रपटांचा समावेश आहे. तसेच, OTT त्याच्या क्राईम-थ्रिलर वेब सीरिजसाठी (Crime Thriller Web Series) प्रसिद्ध आहे. तुम्हीही क्राईम-थ्रिलर वेब सीरिजच्या शोधात असाल तर, नेटफ्लिक्सवर (Netflix) उपलब्ध असलेल्या 5 भारी क्राईम-थ्रिलर वेब-सिरीज नक्की पाहिल्या पाहिजेत... या वेब सीरिज भल्याभल्या हॉलिवूड पटांनाही मागे टाकतात... 


दिल्ली क्राईम (Delhi Crime)


'दिल्ली क्राईम' ही सर्वात लोकप्रिय क्राईम-थ्रिलर मालिका आहे. 2012 साली दिल्ली-एनसीआरमध्ये घडलेली धक्कादायक घटना आणि त्यानंतरचा त्या घटनेचा तपास याबाबत दाखवलं आहे. ही वेब सीरिज आपल्या देशात घडलेल्या निर्भया प्रकरणावर आधारित आहे. यामध्ये अभिनेत्री शेफाली शाह यांचा उत्तम अभिनय तुम्हाला पाहायला मिळतो. उर्वरित स्टार कास्टमध्ये राजेश तैलंग, रसिका दुग्गल आणि आदिल हुसैन महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. 'दिल्ली क्राईम'चा पहिला आणि दुसरा सीझन प्रेक्षकांमध्ये खूप गाजला. 


सेक्रेड गेम्स (Sacred Games)


नेटफ्लिक्सची सर्वाधिक लोकप्रिय मालिका 'सेक्रेड गेम्स' आजही लोकांच्या मनात घर करून आहे. सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी स्टारर 'सेक्रेड गेम्स' या मालिकेचे आतापर्यंत दोन सीझन आले आहेत. पहिला सीझन 2018 मध्ये आला होता. 'सेक्रेड गेम्स' ची कथा एका प्रामाणिक पोलीस आणि गँगच्या म्होरक्याच्या भूतकाळाशी संबंधित आहे. ही वेब सीरिज शेवटपर्यंत लोकांना गुंतवून ठेवते. अनुराग बासू, विक्रमादित्य मोटवानी आणि नीरज घायवान यांनी मिळून ही धमाकेदार वेब सीरिज तयार केली आहे.


इंडियन प्रीडेटर- द बुचर ऑफ दिल्ली (Indian Predator: The Butcher of Delhi)


Netflix वर उपलब्ध असलेली ही भयानक डॉक्युमेंट्री क्राईम-थ्रिलर सीरिज आहे. या मालिकेचे तीन सीझन आले, असून एकाही सीझनचा एकमेकांशी संबंध नाही. ही या वेब सीरिजची खासियत आहे. या मालिकेची कथा सीरियल किलर आणि रेपिस्ट यांच्याभोवती फिरते.


हाऊस ऑफ सिक्रेट्स - बुराडी डेथ्स (House of Secrets: The Burari Deaths)


'हाऊस ऑफ सिक्रेट्स : द बुराडी डेथ्स' ही लीना यादव आणि अनुभव चोप्रा यांनी निर्मित 2021 ची नेटफ्लिक्स माहितीपट मालिका आहे. ही तीन भागांची मालिका बुरारी येथील त्या घरातील 11 सदस्यांवर आधारित आहे, ज्यांचा एकाच वेळी गूढ मृत्यू झाला. 2018 मध्ये बुरारी येथील एका घरात ही घटना घडली होती, ज्यानं संपूर्ण देश हादरला होता. या मालिकेत या सर्व लोकांच्या मृत्यूचा पर्दाफाश करण्याचं काम करण्यात आलं आहे.


कोहरा (Kohara)


गेल्या वर्षी प्रदर्शित झालेली नेटफ्लिक्सची क्राईम थ्रिलर मालिका 'कोहरा'नं देखील प्रेक्षकांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. या मालिकेची कथा एका परदेशात राहणाऱ्या मुलावर आधारित आहे, ज्याचा त्याच्या लग्नाच्या एक दिवस आधी मृत्यू होतो. अशा स्थितीत या गुंतागुंतीच्या प्रकरणाची उकल करण्यासाठी पोलिसांची एक विशेष टीम तयार केली जाते, मात्र या प्रकरणामुळे या टीममधील दोन पोलीस अधिकाऱ्यांचं आयुष्य वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचतं. मग इथून मालिकेची कथा सुरू होते, जी खूपच रंजक असून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते.