मुंबई : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने जीएसटी अधिकाऱ्याला (GST Officer) लाच घेताना अटक केली आहे. इतकंच नाही तर यावेळी सीबीआयने (CBI) सुमारे 43 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. सीबीआयने सीजीएसटीच्या (CGST) एका अधीक्षकाला पाच लाख रुपयांची लाच मागितल्याबद्दल आणि स्वीकारल्याबद्दल अटक केली. याच ठिकाणी तपास घेत असताना पथकाला 42.70 लाख रुपयांची रोकड सापडली. अटक करण्यात आलेल्या जीएसटी अधिकाऱ्याचं नाव हेमंत कुमार असून ते CGST च्या भिवंडी आयुक्तालय अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.


 GST अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक


फियार्दीने सांगितल्यानुसार, कंपनीच्या प्रलंबित जीएसटी प्रकरण निपटवण्यासाठी 30 लाख रुपयांचा अवाजवी फायदा मागितल्याच्या आरोपावरून सीजीएसटी अधीक्षक हेमंत कुमार यांच्याविरुद्ध तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपींने लाच म्हणून 15 लाख रुपयांच्या रकमेची बोलणी केली. याच लाचेला पहिला हप्ता घेताना या जीएसटी अधिकाऱ्याला सीबीआयने रंगेहाथ अटक केली.


सुमारे 43 लाखांची रोकड जप्त


लाचेचा पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराकडून पाच लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने सापळा रचून आरोपी हेमंत कुमारला रंगेहात पकडलं. मुंबई, गाझियाबाद येथील आरोपींच्या कार्यालयात आणि निवासस्थानावर झडती घेण्यात आली असून त्यामध्ये 42.70 लाख रुपयांची रोख रक्कम तसेच मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर दोषी दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीला आज सीबीआयच्या विशेष न्यायाधीश, मुंबई यांच्यासमोर हजर केले असता त्याला 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


नाशिकच्या लाचखोर तहसीलदारावर निलंबनाची कारवाई


नाशिकचा तहसीलदार नरेशकुमार बहिरम (Nraeshkumar Bahiram) याला विभागीय आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे. पंधरा लाखांची लाच घेणाऱ्या तहसीलदार बहिरम यास निलंबित करण्यात आलं आहे. लाच घेतल्यानंतर तहसीलदार चांगलाच चर्चेत आला होता, अखेर नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी आदेश काढले असून बहिरम याचे निलंबन (Suspend) करण्यात आलं आहे.


वैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात 15 लाख रुपयांची लाच घेताना नाशिकचा (Nashik Tahsildar) तहसीलदार नरेशकुमार बहिरम याला एसीबीकडून अटक करण्यात आली. यानंतर जिल्हाभरात खळबळ उडाली. अनेक नागरिकांनी रोष व्यक्त करत या प्रकरणाची गंभीर दाखल घेण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी देखील गंभीर दखल घेत चौकशीसाठी पाच अधिकाऱ्याचे पथकही नेमण्यात आलं होतं.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mumbai Crime News: मुंबईमध्ये वृद्धांची सुरक्षा वाऱ्यावर! सेलोटेपने हातपाय बांधले,तोंडात कापसाचा बोळा कोंबला; ताडदेवमध्ये वृद्ध महिलेची हत्या