Mumbai Crime News: मुंबईहून सोन्याची डिलिव्हरी करन्यास टिटवाळ्यात आलेल्या सोनराना अज्ञात चोरट्याने लुबाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सोनाराची गाडी रिजन्सी रोडवर पंचर झाल्याने त्यांनी गाडी बाजूला उभी केली. त्यानंतर गाडीला जॅक लावताना अज्ञात चोरट्यानी संधी साधत गाडीतील 2300 ग्रॅम सोनं आणि रोकड असा सुमारे 1 कोटी 20 लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथे राहणारे राकेश जैन हे सोन्याचे व्यापारी आहेत. राकेश जैन आज आपल्या पुतण्यासह सोन्याच्या दागिन्यांची डिलिव्हरी करण्याकरता टिटवाळा परिसरात आले होते. त्यांच्या गाडीत एका बॅगेमध्ये चैन, अंगठी, लगड असे एकूण 2300 ग्राम सोन्याचे दागिने व चार लाख रोकड होती. 


राकेश जैन यांची गाडी टिटवाळा मंदिर परिसरातील रिजन्सी रोड येथून जात असताना अचानक पंचर झाली. जैन गाडी बाजूला घेऊन जॅक लावत होते. दरम्यान गाडीतून जैन व त्याचा पुतण्या दोघे खाली उतरले ही संधी साधत अज्ञात चोरट्याने गाडीत ठेवलेली बॅग उचलून तेथून पळ काढला. काहीवेळाने जैन यांची बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. टिटवाळा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला आहे.


संबंधित बातम्या :


'कोरोना इतना बढे की बस मुझे ले जाये', 'डेथ इज गोल, मॅच्युरिटी इज द वे'... वहीमध्ये अशा नोंदी करुन विद्यार्थिनीची आत्महत्या
Nashik News : एक रुपयाच्या भरपाईवर विवाहितेला मोबाईलवर घटस्फोट, सिन्नरमध्ये धक्कादायक प्रकार
Mumbai Crime : आधी एटीएममधील 77 लाखांची चोरी, नंतर एटीएम मशीनच पेटवली, कॅश लोड करणाऱ्या दोघांना अटक


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha