चालत्या बसमध्ये कंडक्टरवर हल्ला; मोबाईल अन् चाकू खिडकीतून फेकला, प्रवाशांमध्ये गोंधळ

संभाजीनगर आगाराची नागपूर-संभाजीनगर एमएच 14 सी .यू. 4958 ही बस नागपूर येथून संभाजीनगरसाठी निघाली होती. वाहक योगेश काळे यांनी नागपूर ते कोंढाळी दरम्यान फिरोज शेख यास तिकीटाची रक्कम मागितली

Continues below advertisement

नागपूर : एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास ही टॅगलाईन चालवून महामंडळाने प्रवाशांचा विश्वास जिंकला आहे. राज्यात कोट्यवधी प्रवासी बसच्या प्रवाशाला प्राधान्य देतात. मात्र, नागपूरमधील (Nagpur) एका घटनेने बसमधील प्रवासाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरहून संभाजीनगरला जाणाऱ्या बसमधील (Bus) एका प्रवाशाला तिकिटाच्या रकमेची मागणी केल्याने प्रवाशाने बस वाहकाशी वाद घालत थेट चाकूने हल्ला केला. या घटनेने चांगलाच गोंधळ उडाला, असून प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. अखेर, आरोपी प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. 

Continues below advertisement

संभाजीनगर आगाराची नागपूर-संभाजीनगर एमएच 14 सी .यू. 4958 ही बस नागपूर येथून संभाजीनगरसाठी निघाली होती. बस वाहक योगेश काळे  यांनी नागपूर ते कोंढाळी दरम्यान प्रवास करणाऱ्या फिरोज शेख यास तिकीटाची रक्कम मागितली. संबंधित प्रवाशाने ऑनलाइन तिकीट असल्याची माहिती दिली. त्यावेळी, वाहकाने मोबाईलवर आलेला मेसेज दाखवण्याची मागणी प्रवाशी फिरोजकडे केली. त्यावरुन, दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. प्रवाशी फिरोज शेखने योगेश काळे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यातून प्रवाशाने बस कंटक्टरवर चाकू हल्ला केल्याची घटना घडली. 

सदर बस कोंढाळी नजिकच्या रिंगणाबोडी गावाजवळ पोहचली, तरीही फिरोजने बस कंडक्टरला ना तिकीट दाखवले, ना तिकीटाची रक्कम देऊन दुसरे तिकीट घेतले. त्यामुळे, वाहक योगेश काळे यांनी फिरोजकडे तिकिटाची रक्कम मागितली. त्यामुळे, संताप व्यक्त करत आरोपी फिरोजने आपल्या जवळीला चाकू काढून वाहकाच्या डोक्यावर हल्ला केला, त्यात वाहक  योगेश काळे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर बसधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, काही प्रवाशांनी हिंमत दाखवत फिरोजला पकडले, दुसऱ्या एका प्रवाशाने पोलिस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली

दरम्यान आरोपी फिरोजने त्याचा मोबाईल फोन आणि चाकू चालत्या बसमधून फेकून दिला.यावेळी, बसचालक संतोष मच्छिंद्र जाधव यांनी प्रसंगावधानता दाखवत बस कोंढाळी पोलीस ठाण्यात आणली. कोंढाळी  पोलिसांनी  योगेश काळे यांना उपचारासाठी कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले व आरोपी फिरोज शेख याला अटक करत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. तर, बसमधील वाहक,चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. 

हेही वाचा

''कोण बी उठतंय बोगद्याचा दरवाजा उघडतंय''; मोहिते पाटलांचं गावरान भाषण, सांगितला पवार भेटीचा किस्सा

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola