Bhiwandi Shocking: दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुण तरुणीनं भिवंडी- कल्याण मार्गावरील दुर्गाडी पुलावरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात (Kongaon Police Station) घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. प्रशांत गोडे (वय 22 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या सोबत असलेल्या तरुणीचे नाव समजू शकले नसल्याचे सांगण्यात आले असून हे प्रेमीयुगल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर, या दोघांनी पुलावरून उडी मारल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी शाहरुख शेख यांनी दिली आहे
मृतक प्रशांत हा आज सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरून एका तरुणीसोबत कल्याणहून भिवंडीच्या मार्गाने जात होता. मात्र, दुर्गाडी पुलावर येताच, त्या दोघांनी दुचाकी पुलावरच साईटला लावली आणि अचानक पुलाच्या कठड्यावरून खाडीच्या पाण्यात उड्या मारल्या. घटनेची माहिती कोनगाव पोलिसांना मिळताच त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने तासाभरात प्रशांतचा मृतदेह खाडी पात्रातून बाहेर काढत उत्तरणीय तपासणीसाठी भिवंडीच्या स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात रवाना केला.
मृत प्रशांत हा कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहणार असून त्याच्या सोबत असलेल्या तरुणीच्या मृतदेहाचा अद्यापही शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच दोघांचे आत्महत्येचे कारण अस्पस्टअसून कोनगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला. तसेच मृतक तरुणाचे नातेवाईकाना घटनेची माहिती दिल्याचेही सांगण्यात आले.
- LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- कल्याण रेल्वे यार्डात मजुरावर हल्ला करुन लुटीचा प्रयत्न, दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
- मुकादमने हातगाडी ओढायचे काम दिले नाही, ज्याला दिले त्याच्या डोक्यात दगड घालून हत्या; आरोपीला अटक
- अनैतिक संबंधात ठरत होता अडथळा म्हणून आईनेच मुलाची हत्या केल्याचा आरोप
Beed Crime: गर्भवती पत्नीसह पतीची आत्महत्या, बीड येथील धक्कादायक घटना; पोलीस तपास सुरू