Thieves Attack : रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या एका मजुरावर धारदार शस्त्राने वार करुन लूटीचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ही घटना कल्याण रेल्वे यार्डात घडली. याप्रकरणी दोन आरोपींना कल्याण जीआरपीने ताब्यात घेतले आहे. अद्याप तिसरा आरोपी फरार आहे. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींमधील एक आरोपी अल्पवयीन असून, त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
 
कल्याण पूर्व भागातील रेल्वे यार्डात देवीदास भले हा तरुण शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास काम करत होता. यावेळी तीन तरुण त्याच्याजवळ आले. या तिघांनी देवीदास याची जबरदस्तीने झाडाझडती सुरु केली. दरम्यान, देवीदासने जोरदार प्रतिकार केला. त्याचा प्रतिकार पाहून हे तिघे आणखीन चिडले. तिघांनी मिळून देवीदासला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. जखमी देवीदासने बचावसाठी आरडाओरडा सुरू केला. हे पाहून तिघे पळायला लागले. यातील एकाला काही नागरिकांनी पकडले. त्याला कल्याण जीआरपीच्या ताब्यात दिले. याप्रकणी पोलिसांनी आणखी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याची विचारपूस केली असता त्याने इतरांची नावे सांगितली. सध्या अल्पवयीन आरोपीस भिवंडी बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. यातील दुसरा आरोपी सद्दाम शेख याला अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरु आहे.



याबाबत पोलीस अधिकारी संपत चव्हाण यांनी सांगितले की, यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. त्याची विचारपूस केली असता त्यांनी इतरांची नावे सांगितली. सध्या अल्पवयीन आरोपीस भिवंडी बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. यातील दुसरा आरोपी सद्दाम शेख याला अटक करण्यात आली आहे. तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरु आहे. जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शारदूल यांच्या मार्गदर्शनाखआली संपत चव्हाण हे  सध्या तपास करीत आहे. या आरोपींना या आधीही असा काही प्रकार केला आहे का? याची पोलीस चौकशी करत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: