Bhiwandi Crime News: भिवंडी (Bhiwandi News) शहरातील वंजारपट्टी नाका परिसरात (Vanjar Patti Naka) जेवण बनवण्याच्या वादातून दगडानं ठेचून एका तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दीपक बर्मन (वय 35 वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे. तसेच, पिज्यू बर्मन (वय 25 वर्ष) असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव असून निजामपूर पोलिसांनी (Nizampur Police) त्याला ताब्यात घेतलं आहे. 


भिवंडी (Bhiwandi) शहरातील वंजारपट्टी नाका परिसरात एका यंत्रमाग कारखान्याच्या कापड गोदामात तीन मजूर काम करत होते. त्यांच्या राहण्याची सुविधा देखील त्याच ठिकाणी होती. तीन मजुरांपैरी पिज्यू बर्मन हा मजूर काही दिवसांपूर्वीच राहण्यास आला होता. हे सर्व मजूर पश्चिम बंगाल येथील रहिवाशी होते. 


जेवण बनवण्यापासून तर सर्व काम एकमेकांच्या संगमतानं करत होते. परंतु काल (बुधवारी) सायंकाळच्या सुमारास पिज्यू बर्मनला दीपक बर्मनने जेवण बनवण्यास सांगितलं. मात्र पिज्यू बर्मननं जेवण बनवता येत नसल्याचं सांगत स्पष्टपणे नकार दिला. याचा पिज्यूला भयंकर राग आला. जेवण बनवण्याच्या वादातून पिज्यू आणि दिपकमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि याच बाचाबाचीचं रूपांतर भांडणात झालं. पिज्यू असं कसं थेट सांगू शकतो? याच विचारानं दीपक रागानं लालबुंद झाला. पण तेवढ्यात संतापलेल्या पिज्यूनं मागचा पुढचा कोणताही विचार न करता थेट दीपकवर दगडानं हल्ला केला. त्याच्या चेहऱ्यावर दगडानं प्रहार केले. एवढंच नव्हे तर रागाच्या भरात दीपकला दगडानं ठेचू लागला. पिज्यूनं संतापाच्या भरात दीपकच्या चेहऱ्यावर आणि डोक्यात दगडानं ठेचून त्याची हत्या केली. ही खळबळजनक घटना बुधवारी घडली. 


दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी निजामपूर पोलीस दाखल झाले. त्यावेळी आरोपी घटनास्थळीच उपस्थित होता. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतलं. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. सध्या निजामपूर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Solapur News : अत्याचाराची तक्रार दिल्याच्या रागातून सोलापुरात अल्पवयीन पीडित मुलीवर जीवघेणा हल्ला; डोक्याला इजा, दोन बोटंही तुटली